"सुभेदार तान्हाजी मालुसरे: एक शौर्यपूर्ण इतिहास" महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैन्याच्या योद्ध्यांच्या अतुलनीय शौर्याने भरलेल्या शिवकालीन इतिहासात एक नवा खण्ड जोडला आहे. त्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती 'सुभेदार तान्हाजी मालुसरे'. तान्हाजी मालुसरे ह्याचं नाव सुवर्णअक्षरांनी लिहिलेलं आहे. त्याच्या वीरत्वाचं चित्रण करण्यात आणखी एक अद्वितीय प्रयत्न 'सुभेदार' चित्रपटाचं आहे. आपल्याला त्याच्या जीवनाच्या अनेक पहिल्या क्रियाकलापांपासून ओळखता येईल. त्याच्या संघर्षातील मानसिकतेचा आणि त्याच्या अद्भुत शौर्याच्या प्रतिमा त्याच्या कल्याणकारी जीवनकार्याच्या संकेतांक म्हणजे 'सुभेदार'. 'सुभेदार' चित्रपटाची निर्मिती विविध प्रोडक्शन कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे झाली आहे. या चित्रपटात प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रु...
Read Moreव्ही.बी. चंद्रशेखर
कोरोनाचा कहर वाढला:पुण्यातील कोरोना प्रतिबंधंक लसीकरण थांबवले; लस उपलब्ध नसल्याने निर्णय, जळगावमध्येही लसीकरण नाही
देशात गेले काही दिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. असे असताना मात्र, पुणे महानगरपालिकेच्या एकाही रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दवाखान्यातील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. यासोबतच जळगावमध्येही कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यापासून पासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. मात्र, असे असताना पुण्यात लसीकरण बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या लसी उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण थांबवले आहे. पुढील 8 दिवसांमध्ये लस उपलब्ध होणार असून तेव्हा पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मनपाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात परिस्थीती नियंत्रणात आहे. मात्र, प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे.
Read Moreट्रोलिंग: इव्हेंटमध्ये पापाराझींसमोर कचरा उचलताना दिसला रणवीर सिंग, यूजर्स म्हणाले – ‘ओव्हर अॅक्टिंगसाठी 50 रुपये कापा’
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता अलीकडेच त्याने मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तो चक्क कचरा उचलताना दिसला. रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रणवीर एका सलूनच्या उद्घाटनाला पोहोचला होता. व्हिडिओमध्ये रणवीर राखाडी पँट आणि काळ्या टी-शर्टमध्ये दिसतोय. सोबतच त्याने काळा गॉगलदेखील घातला आहे. यावेळी रणवीर सिंग पापाराझींसमोर पोहोचताच त्याला ग्रीन कार्पेटवर कचरा दिसला, रणवीरने खाली वाकून तो कचरा उचलला आणि पुढे गेला. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी उडवली रणवीरची खिल्लीएकीकडे काही लोकांना रणवीरची ही स्टाईल आवडली तर दुसरीकडे काही लोक त्याची खिल्लीदेखील उडवत आहेत. एका नेटकऱ्यान
Read More