स्थानिक

राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा:छत्रपती संभाजीनगर संघाने पटकावले 8 पदके; पद्मजा बोरकर, ऋषिकेश मोरेने जिंकले सुवर्णपदक

पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण आठ पदके आपल्या खात्यात जमा केली आहेत. पद्मजा बोरकर आणि ऋषिकेश मोरे यांनी शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. बालेवाडी स्टेडियममध्ये बुडो असोसिएशन ऑफ पुणे व महाराष्ट्र राज्य बुडो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 20 जिल्ह्यातील मुलामुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. छत्रपती संभाजीनगर संघाचे व्यवस्थापक म्हणून अदनान शेख आणि साक्षी जाधव यांनी काम पाहिले. या सर्व खेळाडूंना महेंद्रराज लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकादमीचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक महेंद्र रंगारी व आर. जे. स्पोर्ट्स अकादमीचे मुख्य प्रशिक्षक रहीम जमादार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पदक विजेत्या खेळाडूंचे राज्य संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले, टेक्निकल डायरे

Read More
स्थानिक

टीम इंडिया अडीच तासातच ऑलआऊट, खेळपट्टीवर प्रश्न:ऑस्ट्रेलियन्स म्हणाले- हे कसोटीसाठी योग्य नाही

नागपूरनंतर आता इंदूरच्या खेळपट्टीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ अवघ्या अडीच तासांत 109 धावांत गुंडाळल्याने तज्ञ त्याला सरासरी रेटिंग देत आहेत. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाज हतबल दिसत होते. विशेष म्हणजे की भारताचे पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. खरे तर, सामना सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीवर पाणी सोडण्यात आले, त्यामुळे खेळपट्टी ओलसर राहिली. त्यामुळे विकेटमध्ये पहिल्याच सत्रापासून फिरकीपटूंना मदत मिळू लागली. खेळपट्टीवर 4.8 अंशांचे वळण दिसून आले. नागपुरात 2.5 डिग्रीचे वळण दिसून आले होते. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन मीडियासह अनेक क्रिकेट तज्ज्ञ खेळपट्टीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या स्टोरीमध्ये इंदूरच्या खेळपट्टीवर दिव्यमराठी तज्ज्ञांचे मत जाणून घेणार आहे... त्याआधी वाचा पहिल्या दिवसा

Read More