बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता अलीकडेच त्याने मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तो चक्क कचरा उचलताना दिसला. रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रणवीर एका सलूनच्या उद्घाटनाला पोहोचला होता. व्हिडिओमध्ये रणवीर राखाडी पँट आणि काळ्या टी-शर्टमध्ये दिसतोय. सोबतच त्याने काळा गॉगलदेखील घातला आहे.

यावेळी रणवीर सिंग पापाराझींसमोर पोहोचताच त्याला ग्रीन कार्पेटवर कचरा दिसला, रणवीरने खाली वाकून तो कचरा उचलला आणि पुढे गेला. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

काही नेटकऱ्यांनी उडवली रणवीरची खिल्ली
एकीकडे काही लोकांना रणवीरची ही स्टाईल आवडली तर दुसरीकडे काही लोक त्याची खिल्लीदेखील उडवत आहेत. एका नेटकऱ्याने रणवीरची ही कृती ओव्हर अ‍ॅक्टिंग असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘भारतातील रस्त्यांवर खूप कचरा आहे, तो कधीच उचलला गेला नाही’. तर दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले की, ‘ओव्हर अ‍ॅक्टिंगसाठी 50 रुपये कापा’. एकुणच नेटकरी रणवीरच्या या कृतीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.