तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दुपटीपर्यंत वाढीचा निर्णय:625 वरून 1 हजार रुपये, निमंत्रित व्याख्यात्यांना 1500 मानधन
राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन तसेच कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये म्हणून रिक्त पदांवर तासिका तत्त्वावर अध्यापक यांची नियुक्ती करण्यात येत असून तासिका अशा अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली. या निर्णयानुसार कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ६२५ रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास मानधन मिळेल. शिक्षणशास्त्र , शारीरिक शिक्षण, विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रति तास मान
Read More