राज्यातील तरुण मतदारांचा आकडा एक कोटीच्या वर

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आठ कोटी ९९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ४ कोटी ६३ लाख १६हजार पुरुष तर ४ कोटी २२लाख ४५ हजार महिला मतदार होत्या.

राज्याचे एकूण मतदान ८ कोटी ८५ लाख ६४हजार होते. ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीनुसार विधानसभा निवडणुकीसाठी ८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१ मतदारांची नोंदणी झाली आहे.

 

या आकडेवारीमध्ये एकूण एक कोटी ६ लाख ७६ हजार १३ तरुण मतदारांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात १८ते २५ वयोगटातील एकूण एक कोटी सहा लाख ७६ हजार १३ तरुण मतदार आहेत. यामध्ये ४५ लाख ८१ हजार ८८४ युवती आहेत. तर ६० लाख ९३ हजार ५१८ युवक आहेत.

मुंबई उपनगर, ठाणे व पुण्यात तरुण मतदारांची नोंद सर्वाधिक आहे.तरुणांचा बेरोजगारीचा व महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर असताना हा आकडा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

.

Leave a Comment