मंत्री विनोद तावडेंचे संस्कृती प्रदर्शन; महिलांसमोर वापरला ‘तो’ अपशब्द

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सांस्कृतिक खात्याचा पदभार सांभाळणाऱ्या मंत्र्यांनी महिलांसमोर अक्षेपार्ह शब्द वापरत आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन त्यांनी प्रदर्शन केल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

मुंबईतील कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्स येथे मुलांच्या खेळाच्या मैदानावर सुशोभिकरण सुरु आहे. त्यावेळी स्थानिक नागरिकांशी बोलताना विनोद तावडे यांची जिभ घसरली. समोर उभ्या असलेल्या महिला वर्गाचं देखील त्यांना भान राहिले नाही.

यावेळी नागरिक त्यांच्याशी बोलत असताना तावडे यांनी लोकांना “तुम्ही भांडलात तर इथं *ट खेळता येणार नाही,” असे म्हटले. या संबंधीत व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओ- 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

सिंचनचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे माझ्यासाठी मराठा धनगर आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा – अजित पवार

“तुम्ही अभ्यास केला आम्हालाही करू द्या”; अजित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment