मोदि सरकारच्या काळात अजून एक उच्चांक, गेल्या ४५ वर्षातील सर्वात भीषण बेरोजगारी असल्याचे वास्तव आले समोर..

नवी दिल्ली: National Sample Survey Office या सरकारी संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातल्या बेरोजगारीने एक नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी नोटबंदीनंतर देशात निर्माण झाली आहे. २०१७-१८ साली देशातील बेरोजगारीचा दर ६.१ इतका होता या आधी इतकी वाईट परीस्थिती १९७२ साली निर्माण झाली होती, नोटबंदीच्या काळात छोटे उद्योगधंदे बंद पडले, आर्थिक विकासाचा वेग मंदावला तसेच कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसला, म्हणून हि स्थिती उद्भवली असल्याचे तज्ञांचे मत आहे.

नुकताच सरकारच्या मनमानी धोरणांना कंटाळून राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता. नोटाबंदीनंतर बेरोजगारांच्या संख्येत झालेला बदल मोजण्यासाठी NSSO (National Sample Survey Office) द्वारे एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेचा अहवाल केंद्र सरकारने मांडला नसल्याचे कारण देखील या दोन सदस्यांच्या राजीनाम्यामागे असल्याचे पुढे येत होते.

या दोन सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून हा अहवाल अजूनही सार्वजनिक केला गेलेला नसला तरी मिडीयाच्या हाती हा शासकीय अहवाल लागला आहे.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालामार्फत नोटबंदीनंतर घेण्यात आलेला हा पहिला सर्व्हे होता. या सर्व्हेनुसार, नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक भारतीयांना रोजगार गमवावे लागले.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment