..आणि एका रात्रीत आदिवासींची जमीन उद्योगपतींची झाली

आलनार, दांतेवाडा, (छत्तीसगड) : नक्षली समस्यांनी ग्रस्त असलेल्या आलनार या गावातील आदिवासी समाजाच्या सामुहिक मालकीची असलेली शेकडो एकर जमीन एका रात्रीत आरती स्पंज एन्ड पावर लिमिटेड या कंपनीच्या मालकीची झाली. आदिवासी वनजमीन हक्क कायद्याअन्वये आदिवासी पाड्यांच्या आजूबाजूच्या जमिनीवर स्थानिक आदिवासींची सामुहिक मालकी असते.

गावातले सर्व सज्ञान नागरिक सभासद असलेल्या ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय ह्या जमिनीवर कुठलाही प्रकल्प उभारता येत नाही.

आलनार ग्रामसभेच्या ग्रामस्थांनी आरती स्पंज कंपनीला आपली वनजमीन देण्याचा विरोध केलेला असतानाही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मंजुरी मिळाल्याचे सांगत परस्पर हि शेकडो एकर वनजमीन आरती स्पंज कंपनीला हस्तांतरित केली आहे.

आलनार च्या ग्रामस्थांना आपली जमीन  या कंपनीला दिल्या गेल्याचं तेव्हा समजलं जेव्हा या भागाचा सर्वे करायला कंपनीच्या गाड्या या भागात फिरू लागल्या, एरवी शांत असलेल्या आदिवासी पाड्यात गाड्यांची वर्दळ बघून स्थानिक ग्रामस्थांनी चौकशी केली तेव्हा आपल्या पिढीजात जमिनीचा झालेला हा सौदा त्यांच्या समोर आला. २०१६ साली भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना स्थानिक जिल्हाधीकार्यानी स्थानिक वनाधिकार हक्क समितीची बैठक झाल्याचं नमूद करून हि जमीन हस्तांतरित करण्यास आदिवासींचा विरोध नसल्याचे पत्र दिले होते.

आता नवीन राज्य सरकारच्या काळात हि दिलेली जमीन आम्हाला परत मिळावी अशी मागणी आदिवासींनी केली आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment