‘साहेबरावला’ मिळणार कृत्रिम पाय

 

२०१२ साली चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या जंगलात राहणाऱ्या वाघाचा पाय शिकाऱ्यांनी लावलेल्या चिमट्यात अडकल्याने जखमी झाला होता. या वाघाचे नाव ‘साहेबराव’ आहे. या अपघातात साहेबरावच्या पायाला गंभीर जखम झाली होती. तेव्हापासून साहेबरावला नागपूर मधील गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये उपाचारासाठी ठेवण्यात आले आहे. डॉ. सुश्रुत बाभुळकर यांनी त्यानंतर साहेबरावला दक्तक घेतले.तेव्हापासून  त्याचा सर्व उपचार बाभुळकर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

या अपघातात साहेबरावच्या डाव्या पंजाचा काही भाग तुटला. गेली सहा वर्ष साहेबरावाला चालणे कठीण जात होते. गेल्या सहा महिन्यात त्याच्या पायाच्या वेदना वाढत गेल्या ,या वेदना सहन होत नसल्याने तो सतत विव्हळत होता.

 

या दुखण्यावर WRTC (Wildlife Research And Training Centre) ने एक तोडगा काढला. त्यांनी साहेबरावाला कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेतला. या सर्जरीच्या पहिल्या टप्प्यात साहेबरावाच्या कृत्रिम पायाचा रेडिओग्राफिक अभ्यास केला गेला. त्यांनतर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुश्रुत बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल ९ ऑक्टोबर रोजी या सर्जरीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. या टप्प्यामध्ये साहेबरावावर ४० मिनिटांची सर्जरी केली गेली.

या सर्जरी दरम्यान साहेबराववर न्यूरोमा आणि आर्थ्रायटिसची प्रक्रिया केली गेली. “या सर्जरीमुळे साहेबरावाच्या पायातील ९९% दुखणे कमी होईल आणि साहेबरावाला कृत्रिम पाय बसवायला अजून तीन ते चार आठवडे लागतील” असे डॉ. बाभुळकर म्हणाले. या सर्जरीमध्ये WRTC चे डॉ. शिरीष उपाध्ये, गौतम भोजने, आणि डॉ. विनोद धूत यांनी ही सहभाग घेतला.

या संपूर्ण सर्जरी नंतर साहेबराव पून्हा पाहिल्या सारखं चालू शकेल. जर ही सर्जरी यशस्वी झाली तर  वाघाला कृत्रिम अंग बसणवण्याची ती जगातील पहिली सर्जरी असेल.

.

Leave a Comment