‘जेट’च भवितव्य अंधातरीत! ‘जेट’वर बोली लावण्यास कोणी तयार नाही

नवी दिल्ली : लिलावात निघालेली जेट एअरवेज कंपनीवर अजून एक संकट आले आहे. जेट कंपनी लिलावात निघाली आहे, मात्र तिचा भांडवली हिस्सा खरेदी करण्यात कोणीही रुचि दाखवत नाही हे समोर येत आहे. इच्छुक गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्याची चिन्ह होती. मात्र तेही आखडता हात घेत आहेत. त्यामुळे जेट कंपनी बंद पडण्याची शक्यता वाढत आहे.

सध्या जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्यासाठी १० मे पर्यंत निविदा सादर करणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत एकाही कंपनीने निविदा दिली नाही. सध्या जेटचे हंगामी व्यवस्थापन स्टेट बँक ऑफ इंडिया संभाळत आहे. त्यामुळे जेट कंपनीचा भार स्टेट बँक ऑफ इंडियावर आला आहे. जेटवर तब्बल साडेआठ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसंच ही कंपनी तोट्यात आहे. अनेकांचे कर्ज असल्याने कंपनीच्या अधिक विमानांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे कंपनीने आपली सेवाही काही काळासाठी बंद केली आहे.

जेटला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँकेने निविदा प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ३० एप्रिल ही अंतिम तारिख देण्यात आली नंतर ती वाढवून १० मे करण्यात आली. मात्र अद्यापही कोणत्याही कंपनीने या प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. याच्या मध्यंतरीच्या काळात जेटच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांशी निवीदा प्रक्रियेसह इतर मुद्द्यांवर चर्चा केली.

जेट एअरवेज कंपनीवर सध्या साडेआठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून पगार दिला गेला नाही. या कंपनीत सुमारे २२ हजार कर्मचारी आहेत. त्यात १६ हजार पे रोलवर आहेत तर ६ हजार कर्मचारी करारबद्ध आहेत. जेट कंपनी बंद झालीच तर या २२ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment