मोदि शहा शपथ घेणार का ?

येत्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण बरेच तापल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडीला नवं आव्हान दिलं आहे.
भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधी पक्षांना ‘चोरांचे बंधन’ म्हणून नोव्हेंबर मध्ये हिणवले होते.

यावर बोलताना तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, अरुण जेटली, रवी शंकर प्रसाद यांना आव्हान करताना,’येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये या विरोधी २३ पक्षांची कोणतीच मदत घेणार नाही, अशी शपथ घ्यावी व हे लिखित स्वरुपात द्यावे’ असे आव्हान केले आहे.

येत्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये बारतीय जनता पार्टी या २३ विरोधी पक्षांची सत्ता स्थापनेसाठी मदत घेणार का? आणि तेजस्वी यादव यांनी दिलेले आव्हान मोदी-शहा स्वीकारणार का? हे बघण्यासारखे आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment