मृत वैमानिकाच्या कुटुंबियांचा संरक्षण विभागावर रोष

या महिन्याच्या पहिल्या दिवशीच भारतीय नौसेनेच्या मिराग २००० या फायटर विमानाचा अपघात होवून त्यात सुशांत अब्रोल व सिद्धार्थ नेगी या दोन शिकावू वैमानिकांचा मृत्यू झाला.


१ फेब्रुवारी रोजी झालेल्या या अपघातात शहीद झालेल्या सुशांत अब्रोल यांच्या कुटुंबीयांनी या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी करताना व्यवस्था हि भ्रष्टाचार करून चीज आणि वाईन चा आनंद घेते तर, दुसरीकडे हीच व्यवस्था जवानांना हद्दपार झालेले मशीन्स देवून त्यांचे जीव धोक्यात घालण्यास भाग पाडते, असा आरोप करत संरक्षण विभागाच्या कारभारावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला आहे.

सुशांत अब्रोल यांच्या पत्नी गरिमा अब्रोल यांनी इन्स्टाग्रामवर कविता शेयर करत व्यवस्थेच्या कारभाराची दुसरी बाजू लोकांसमोर मांडली आहे.

सुशांत अब्रोल यांच्या विमानाचा अपघात १ फेब्रुवारी रोजी, बंगलोर येथील विमानतळानजीक झाला. या अपघाताची चौकशी करण्याचे काम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment