विधानसभा २०१९ महाराष्ट्रातील पाचही विभागांचा सविस्तर आढावा

विधानसभा २०१९ महाराष्ट्रातील पाचही विभागांचा सविस्तर आढावा

महाराष्ट्र देशातील लोकसंख्येनुसार दुसरे सर्वात मोठा राज्य आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हे पाचही विभाग मिळून महाराष्ट्र राज्य बनते. या पाचही विभागांचे प्रश्न वेगळे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं होतं तर मराठवाड्यात दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे विभागीय प्रश्नांचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात होणार असं दिसतंय. महाराष्ट्रातील पाचही विभागांचे प्रश्न एकमेकांपासून अत्यंत वेगळे आहेत. शेती, अर्थकारण, लोकसंख्या, साक्षरता, सहकार, पायाभूत सुविधा,पाणी, महिला सुरक्षा अशा अनेक गोष्टींचा परिणाम मतदानावर होत…

पुढे वाचा ..

विधानसभा निवडणुकीत महिलांना सरासरी १०% पेक्षा ही कमी उमेदवारी

विधानसभा निवडणुकीत महिलांना सरासरी १०% पेक्षा ही कमी उमेदवारी

  महाराष्ट्राच्या एकूण २८८ जागांची सरासरी काढली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फक्त १० टक्के महिलांना सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण फक्त भाषणा पुरतच राहिलं आहे असं दिसतंय. इतर वेळेस महिलांच्या हक्कासाठी गळे काढणारे राजकारणी महिलांच्या उमेदवारी बाबद काहीच बोलताना दिसत नाहीत.महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये एकूण १३१ पक्षांचे ३२३७ उमेदवार मैदानात आहेत. या ३२३७ पैकी फक्त २३५ एकूण महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने फक्त १५…

पुढे वाचा ..

महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा चेहरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा चेहरे

महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्तिमत्व अशी आहेत ज्यांचा राजकारणामध्ये दांडगा अनुभव आहे. अनुभव आणि राजकारणातील डावपेचांमध्ये ही व्यक्तिमत्व माहीर झालेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणावर ही त्यांनी छाप सोडली आहे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या दांडगे व्यक्तिमत्वाच्या लोकांची राजकारणातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. येणाऱ्या काळात राजकारणात एक नवी पिढी सक्रिय होताना दिसत आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरुण व्यक्तिमत्त्वांचा समावेश जास्त दिसून येत आहे. या तरुण उमेदवारांमध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे…

पुढे वाचा ..

सहा लाखात आदित्य ठाकरेंना बीएमडब्ल्यू कशी मिळाली?

सहा लाखात आदित्य ठाकरेंना बीएमडब्ल्यू कशी मिळाली?

  ठाकरे घराण्यातील कोणीतरी निवडणूक लढवत आहे हे महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचे आहे. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढणारे पहिले ठाकरे ठरणार आहेत. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. ते म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या बीएमडब्लू गाडीच्या किमतीमुळे . त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी बीएम डब्लू ची किंमत फक्त सहा लाख रुपये   दाखवली आहे. MH02CB1234 ही आदित्य यांची फाईव सिरीज बीएमडब्ल्यू. या गाडीची मूळ किंमत पन्नास लाख रुपये इतकी आहे.        …

पुढे वाचा ..

वाघासारखे पट्टे असलेल्या मांजरी सापाला ठाकरेंचं नाव.

वाघासारखे पट्टे असलेल्या मांजरी सापाला ठाकरेंचं नाव.

महाराष्ट्रातील पश्चिम घाटात एक नवीन  सापाचा शोध लागला असून, त्या सापाला उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचे नाव देण्यात येणारा आहे. हा साप सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात सापडला आहे. तो cat snake या प्रजातीचा आहे. अशा सापाचा शोध तब्बल १२५ वर्षांनी लागला आहे. वन्य जीव रिसर्च टीमने या सापाचा शोध लावला आहे. तेजस ठाकरे हे या टीमचा भाग होते.       तेजस ठाकरे यांना हा साप २०१५ साली पहिल्यांदा दिसला. तेव्हा पासून तेजस…

पुढे वाचा ..

शिवसेनेचा भगवा रंग का हटवला?; शिवसैनिकांसह नेटकरी नाराज

शिवसेनेचा भगवा रंग का हटवला?; शिवसैनिकांसह नेटकरी नाराज

मुंबई :  लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. या लोकसभेला अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यात लक्ष खेचून घेणारी म्हणजे शिवसेना आणि भाजपची युती. कारण गेल्या ५ वर्षांत शिवसेनेनं भाजपविषयी नेहमीच गरळ ओकली. स्वबळावर लढण्याचा नारा दिला. मात्र हे सर्व बाजूला सारत त्यांनी भाजपशी गळाभेट केली. त्यानंतर मात्र शिवसेना आता भाजपची री ओढत नाहीएना असं वाटू लागले आहे. कारण शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरील प्रोफाईल बदलण्यात आले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेनं या प्रोफाईलमधील फोटोत…

पुढे वाचा ..

सेन्सॉरच्या कचाट्यात ‘ठाकरे’, संजय राऊत ठाम !

सेन्सॉरच्या कचाट्यात ‘ठाकरे’, संजय राऊत ठाम !

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारभूत असलेला बहुचर्चित सिनेमा ‘ठाकरे’ प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. या वादात सिनेमाचा ट्रेलर तर प्रदर्शित झाला आहे पण काही दृश्ये आणि संवादांवर सेन्सोर बोर्डने आक्षेप घेतला आहे. बघुया काय आहे ट्रेलर ! दाक्षिणात्यांविरोधात सेनेकडून यांडुगुंडू असा शब्द प्रयोग करण्यात आला होता.  चित्रपटात तसा उल्लेख असल्याने सेन्स़ॉर कात्री लावण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे बाबरी बाबत आक्षेपाहर्य दृश्य तसेच आणखी तीन संवाद सेन्सॉर बोर्डच्या कचाट्यात सापडले आहेत. शिवसेना…

पुढे वाचा ..

२०१४ ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही: शिवसेना

२०१४ ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही: शिवसेना

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली.’ २०१४ ची पुनरावृत्ती २०१९ मध्ये होणार नाही’ अशा शब्दात शिवसेनेने टीका केली. महाराष्ट्रामध्ये तर जिंकूच पण राष्ट्रीय पातळीवरही शिवसेना स्वबळावर लढू शकते असा दावा या अग्र्लेखामध्ये करण्यात आला आहे.आज  आमच्यासमोर बऱ्याच अडचणी आहेत. तरीही आम्हाला विश्वास आहे कि, येणाऱ्या निवडणुकांमध्ये  महाराष्ट्रात आणि देशपातळीवरही शिवसेना महत्वाची कामगिरी बजावेल असे या लेखात म्हणले आहे. धुळीचे वादळ फक्त दिल्लीने नाही तर संपूर्ण देशाने अनुभवले आहे, फक्त…

पुढे वाचा ..

अमित शाह मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची घेणार भेट

अमित शाह मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची घेणार भेट

मुंबई : पोटनिवडणूकीत झालेल्या पराभवामुळे भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीची तयारी म्हणून  संपर्क अभियान सुरू केले आहे. २०१९ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपावर नाराज असणाऱ्या पक्षाची समजूत काढण्याची जबाबदारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली आहे. संपर्क अभियानाअंंतर्गत बुधवारी अमित शहा हे भाजपाचे जुने मित्रपक्ष आणि मागील काही दिवसापासून नाराज असलेल्या शिवसेना पक्षाचे उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. मागील काही पोटनिवडणुकीत भाजपाला यश मिळाले नाही. मात्र पालघरमध्ये त्यांनी यश प्राप्त केले होते….

पुढे वाचा ..