मोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार

मोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार

मुंबई : लोकसभा निवडणुकांचा ज्वर ओसरला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता निकालावर लागले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी केदारनाथ येथे जाऊन दर्शन घेतले. त्यांचा दौराही चर्चेचा विषय ठरला आहे. या दौऱ्यात मोदींनी परिधान केलेल्या वस्त्रांपासून त्यांनी तेथे केलेले फोटो शुट सर्वांवर चर्चा होत होती. या मोदींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर टीका केली….

पुढे वाचा ..

पार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री!!!

पार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री!!!

पुणे : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘बाप माणूस’ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. त्यांना राजकारणातील ‘चाणाक्य’ म्हटलं जाते. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे राजकारणातील वावर पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हे सर्वांसाठी केंद्रच बनले आहे. त्यांच्या सोबत असणारे कौतुक करतात तर विरोधक त्यांच्यावर टीका केल्याशिवाय शांत होत नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार निवडणूक लढवणार की नाही या चर्चांना उधाण आले होते. खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर एकाच घरातून लोकसभेला किती उमेदावर उतारावेत याला मर्यादा…

पुढे वाचा ..

राहुल गांधीच देशाचं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात : शरद पवार

राहुल गांधीच देशाचं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात : शरद पवार

पाटण, जि. सातारा : येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम आहेत असं महत्वपूर्ण विधान देशाचे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात काँग्रेस पक्षाला मिळालेला विजय लक्षात घेता पवारांच्या या विधानाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. गेल्या काही महिन्यात शरद पवार हे तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होते. बिजू जनता दल, तृणमुल काँग्रेस व इतर छोट्या पक्षांशी त्यांची चर्चाही सुरू…

पुढे वाचा ..

तिसरी आघाडी शक्य नाही: शरद पवार

तिसरी आघाडी शक्य नाही: शरद पवार

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि इतर पक्ष तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाआघाडीची शक्यता नाकारली आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकिला सामोरे जाण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने कॉंग्रेस प्रयत्न करत आहे. परंतु तिसरी आघाडी अस्तित्वात येणे शक्य नाही असे विधान करत शरद पवार यांनी महाआघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. सध्याची परिस्थिती हि १९७७ सारखी आहे. इंदिरा गांधीना आणीबाणीनंतर पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी कोणतीही आघाडी नव्हती. निवडणुकीनंतर सर्व विजयी पक्ष एकत्र आले….

पुढे वाचा ..

अपयशामुळे मोदींना आणीबाणीची आठवण : शरद पवार

अपयशामुळे मोदींना आणीबाणीची आठवण : शरद पवार

मोदींचे सरकार अपयशी ठरत असल्यामुळे त्यांना आणीबाणीची आठवण आली अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसेच आणीबाणीविषयी आताच का बोलले जात आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास शरद पवार उपस्थित होते. मोदी सरकारला आलेले अपयश लपवण्यासाठी इतक्या वर्षांनंतर त्यांना आणीबाणी आठवत आहे असे विधान त्यांनी यावेळी केले. जनतेमध्ये मोदी सरकारबद्दल असलेली नाराजी आणि सरकारचे अपयश यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशी…

पुढे वाचा ..

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान मान्य नाही. ते संविधानामध्ये बदल करू पाहत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला विभागाच्या  ‘संविधान बचाव – देश बचाव’ या मोहिमेच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचे उदाहरण दिले. इंदिरा गांधींनी १९७७ मध्ये संविधानावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना जनतेने पराभूत केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे भाजपने संविधानामध्ये बदल करण्याचा प्रयत्न…

पुढे वाचा ..