विधानसभा २०१९ महाराष्ट्रातील पाचही विभागांचा सविस्तर आढावा

विधानसभा २०१९ महाराष्ट्रातील पाचही विभागांचा सविस्तर आढावा

महाराष्ट्र देशातील लोकसंख्येनुसार दुसरे सर्वात मोठा राज्य आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हे पाचही विभाग मिळून महाराष्ट्र राज्य बनते. या पाचही विभागांचे प्रश्न वेगळे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं होतं तर मराठवाड्यात दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे विभागीय प्रश्नांचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात होणार असं दिसतंय. महाराष्ट्रातील पाचही विभागांचे प्रश्न एकमेकांपासून अत्यंत वेगळे आहेत. शेती, अर्थकारण, लोकसंख्या, साक्षरता, सहकार, पायाभूत सुविधा,पाणी, महिला सुरक्षा अशा अनेक गोष्टींचा परिणाम मतदानावर होत…

पुढे वाचा ..

महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा चेहरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा चेहरे

महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्तिमत्व अशी आहेत ज्यांचा राजकारणामध्ये दांडगा अनुभव आहे. अनुभव आणि राजकारणातील डावपेचांमध्ये ही व्यक्तिमत्व माहीर झालेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणावर ही त्यांनी छाप सोडली आहे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या दांडगे व्यक्तिमत्वाच्या लोकांची राजकारणातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. येणाऱ्या काळात राजकारणात एक नवी पिढी सक्रिय होताना दिसत आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरुण व्यक्तिमत्त्वांचा समावेश जास्त दिसून येत आहे. या तरुण उमेदवारांमध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे…

पुढे वाचा ..

शेतकऱ्यांनी सुजय विखेंना पाठवले दोन हजार रुपये

शेतकऱ्यांनी सुजय विखेंना पाठवले दोन हजार रुपये

भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अलीकडेच कर्जत जामखेड मध्ये प्रचारादरम्यान, शेतकऱ्यांना संबोधून एक वक्तव्य केले. “तुम्हाला पंतप्रधान मोदी यांनी खात्यावर टाकलेले दोन हजार रुपये चालतात. मग भाजपचे चिन्ह असलेले कमळ का नको? मतदान करायचं नसेल तर खात्यावर जमा केलेले पैसे शेतकऱ्यांनी परत करावेत” या वाद्ग्रस्त वक्तव्यानंतर मीडियाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवलीच पण या वक्तव्यामुळे सुजय विखे यांनी मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचा रोष ही ओढवून घेतला. याच वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेर मधील काही तरुण शेतकऱ्यांनी, थेट सुजय…

पुढे वाचा ..

खोब्रागडे यांना भाताच्या वाणाचे पेटंट मिळावे

खोब्रागडे यांना भाताच्या वाणाचे पेटंट मिळावे

खोब्रागडे यांनी शोधलेल्या तांदळाच्या जातींना पेटंट मिळवून देण्यासाठी सरकारने मदत करावी,असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. चन्द्रपूरमधील खोब्रागडे यांच्या कुटुंबाला काल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट दिली, असे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले. खोब्रागडे कुटुंबीयांनी राहुल यांच्यासोबत चर्चा करताना हि मागणी केली. आम्ही नक्कीच या गोष्टीचा आढावा घेत आहोत. तांदळाच्या ९ जातींचे पेटंट, चंद्रपूरमध्ये धान्य   संशोधन केंद्र उभारण्यासाठीची मदत तसेच कुटुंबातील २ जणांना शासकीय नोकरी मिळावी या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. भातशेतीमध्ये क्रांतिकारक काम करणाऱ्या खोब्रागडे…

पुढे वाचा ..

जनतेसोबत युती , आंध्रमध्ये कॉंग्रेसचा नारा

जनतेसोबत युती , आंध्रमध्ये कॉंग्रेसचा नारा

जनतेसोबत युती हे आंध्रमध्ये कॉंग्रेसपक्षाचे घोषवाक्य असणार आहे ,असे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव उम्मन चंडी म्हणाले. आंध्र प्रदेशात कॉंग्रेसने इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी कॉंग्रेस कार्यकारी कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. आम्हाला माहिती आहे हे कार्य आव्हानात्मक आहे, पण तरीही आम्ही जनतेसोबत लढून पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा मिळवू असे त्यांनी सांगितले. भाजपने आंध्रप्रदेशात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, भाजपची हि खेळी लोकांनी ओळखली आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे अशा शब्दात त्यांनी…

पुढे वाचा ..

कार्यक्रमानंतर अजितदादांचे “सफाई अभियान”

कार्यक्रमानंतर अजितदादांचे “सफाई अभियान”

पुण्यातील सहकारनगर येथे १० जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीच थोड्या अंतरावर कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या लावलेल्या होत्या. मात्र सभेला एकत्र झालेला जनसमुदाय पाहता कचरा झालाच होता, मात्र ११ जून रोजी अजित पवार कार्यक्रमस्थळी गेले असताना त्यांना तिथे पाण्याच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या, हे पाहताच अजितदादांनी त्या बाटल्या स्वतः उचलायला सुरुवात केली, हे पाहून जमलेले कार्यकर्ते पुढे आले व त्यांनीही हे सफाई अभियान पूर्ण केले.   आपण…

पुढे वाचा ..