महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा चेहरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा चेहरे

महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्तिमत्व अशी आहेत ज्यांचा राजकारणामध्ये दांडगा अनुभव आहे. अनुभव आणि राजकारणातील डावपेचांमध्ये ही व्यक्तिमत्व माहीर झालेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणावर ही त्यांनी छाप सोडली आहे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या दांडगे व्यक्तिमत्वाच्या लोकांची राजकारणातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. येणाऱ्या काळात राजकारणात एक नवी पिढी सक्रिय होताना दिसत आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरुण व्यक्तिमत्त्वांचा समावेश जास्त दिसून येत आहे. या तरुण उमेदवारांमध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे…

पुढे वाचा ..

राज्यातील तरुण मतदारांचा आकडा एक कोटीच्या वर

राज्यातील तरुण मतदारांचा आकडा एक कोटीच्या वर

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आठ कोटी ९९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ४ कोटी ६३ लाख १६हजार पुरुष तर ४ कोटी २२लाख ४५ हजार महिला मतदार होत्या. राज्याचे एकूण मतदान ८ कोटी ८५ लाख ६४हजार होते. ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीनुसार विधानसभा निवडणुकीसाठी ८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१ मतदारांची नोंदणी झाली आहे.   या आकडेवारीमध्ये एकूण एक कोटी ६ लाख ७६ हजार १३ तरुण मतदारांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात १८ते…

पुढे वाचा ..

शरद पवारांना या निवडणुकीनंतर कायमचे रिटायर करू – -चंद्रकांत पाटील.

शरद पवारांना या निवडणुकीनंतर कायमचे रिटायर करू – -चंद्रकांत पाटील.

  येत्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांना राजकारणातून कायमची विश्रांती देऊ. असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.यावेळेस ते असेही म्हणाले मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने बराच प्रयत्न केला पण त्यांना तिथे साधा उमेदवारही मिळाला नाही. त्यावरून या दोन्ही पक्षांची ताकद किती कमकुवत झाली आहे हे कळते. मी कोथरुड मधून निवडून येणारे हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेचे राधानगरी मतदारसंघातील उमेदवार प्रकाश अंबीटकर यांच्या प्रचार सभेत…

पुढे वाचा ..

गडकरींचा आशीर्वाद माझ्या सोबत : कॉंग्रेस नेते आशिष देशमुख.

गडकरींचा आशीर्वाद माझ्या सोबत : कॉंग्रेस नेते आशिष देशमुख.

कॉंग्रेसचे आशिष देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आशिष देशमुख हे दीड वर्षा पूर्वी भाजप मध्येच होते. मात्र आत्ता ते काँग्रेस च्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आशिष म्हणाले मुख्यमंत्री विदर्भद्रोही आहेत,वेगळा विदर्भ होण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. या मुळे विदर्भ आणि नागपूरची जनता फडणवीस यांच्यावर नाराज आहे. याच कारणांमुळे दक्षिण पश्चिम मतदारसंघात परिवर्तन होईल आणि फडणवीस पडतील. नितीन गडकरी मला पितृतुल्य आहेत, आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या…

पुढे वाचा ..

‘आधी गुजरात, मग देश’ नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम

‘आधी गुजरात, मग देश’ नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम

नवी दिल्ली : काल देशात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत या पावसात गारपीटही झाली. या पावसाने देशभरात तब्बल ३५ ते ४० जणांचे प्राण घेतले. तर अनेक राज्यांत शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे मध्य प्रदेशात तब्बल १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर गुजरात आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे ११ आणि ७ जणांचा बळी या पावसाने घेतला. तर महाराष्ट्रातही वीज पडून एका शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत….

पुढे वाचा ..

खाद्यपदार्थांच्या पार्सलचे दर वाढणार

खाद्यपदार्थांच्या पार्सलचे दर वाढणार

राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर ग्राहकांना खाद्यपदार्थांच्या पार्सलसाठी अधिकचे दर मोजावे लागतील अशी माहिती  इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशने दिली आहे. प्लास्टिक बंदीमुळे खाद्यपदार्थ पार्सल करण्यासाठी पुन्हा वापर करता येण्याजोगे कंटेनर्स वापरण्यात येत आहेत. यांचा दर १ ते ३ रुपयांपर्यंत आहे. हॉटेल किंवा रेस्तराँमधून अन्न पार्सल घेणाऱ्या ग्राहकांना २० टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. या नवीन इकोफ्रेण्डली कंटेनर्समुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तरी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा एएचार प्रमुख संतोष शेट्टी…

पुढे वाचा ..