“रस्ते बांधणे थांबवा, संपत्ती विका” मोदी सरकारचा NHAIला आदेश

भारतीय अर्थव्यवस्था किती अडचणीत आहे याची प्रचिती नुकतीच आली जेव्हा सरकारने रिझर्व्ह बँकेकडून एक लाख शहात्तर हजार कोटी इतकी मोठी रक्कम ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घेतली. देशात बेरोजगारी सर्वोच्च सीमेला आहे, रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. आत्तापर्यंत अर्थमंत्री निर्मला सितारमण सर्व काही आलबेल असल्याचे भासवत होत्या. पण स्थिती किती गंभीर आहे याची जाणीव करून देणारी एक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे सरकारने NHAI national highway authority of India ला सध्या देशभर सुरू असणारी सर्व रस्त्याची कामे थांबण्यास सांगितले आहे.

नितीन गडकरी जे केंद्रीय वहातूक अणि दळणवळण मंत्री आहेत यांनी मागील पाच वर्षात अतिशय अक्रम रित्या रस्त्याची कामे देशभर चालू केली. त्यांची बरीच प्रशंसा ही झाली गडकरीजी जाईल तिथे काही हजार कोटी, ते काही लाख कोटी असे मोठ मोठे आकडे सांगत लोकांना ही देशात बराच काम चालू आहे असे वाटत होते. पण साध्या स्थिती तशी नाहिये.

रस्ते बांधणे आता आपल्याला परवडणारे नाही त्यामुळे चालू असलेली सर्व कामे थांबवा. NHAI कडे असणारी जमीन व इतर मालमत्ता विका अणि खर्च भागवा. असा आदेश देणारे पत्र खुद्द पंतप्रधान कार्यालयातून ‘रोड अँड ट्रान्स्पोर्ट मिनिस्ट्री’ चे सचिव संजीव रंजन यांना 17 ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलं.

आज देशभरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे ज्यामुळे ते काम अधिक खर्चिक झाले आहे. पर्यायी रस्ता नसल्याने लोकांचे हाल ही होत आहेत. त्यातच जर काम थांबले तर परिस्थिती अजूनच बिकट होईल.

खाजगी कंपन्यांनी ‘ग्रीन फील्ड’ चि कामे थांबवली आहेत, त्यामुळे पत्रात असे म्हंटले गेले आहे की तुम्ही तात्काळ तुमच्याकडील मालमत्ता विका, सर्वात जास्त बोली लावणार्‍याला टोल नाके द्या अणि लोकांकडून पैसे वसुल करा. पत्रात NHAI ने स्वतःला एक “रोड असेट मॅनेजमेंट” कंपनी बनण्याचा ही सल्ला दिला आहे. त्याद्वारे तुम्ही २०३० पर्यंतचा आखाडा तयार करा अश्या ही सुचना त्यात करण्यात आल्या आहेत.

२०१९ ला नवीन सरकार बनताच अशी घोषणा करण्यात आली होती की येत्या पाच वर्षांत शंभर लाख कोटी रुपये आम्ही रस्त्यावर खर्च करून पण सध्या स्थिती अशी आहे की चालू प्रोजेक्ट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

.

Leave a Comment