लोकसभा निवडणूक २०१९: निवडणूक प्रचारातील “सैनिक”

लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या भारतात आहे. त्यामुळे आपल्या पक्षांचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. या प्रचारांच्या रणधुमाळीत प्रत्येक जण कोणत्याना कोणत्या गोष्टींचे श्रेय घेत असतो, हे आपण पाहतोच. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच चांगल्या कामाचे श्रेय घेतात. मग ते कोणी दुसऱ्याने केलेले असोत.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय वायु सेनेनं पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला. तसंच उरी हल्ल्याचाही भारतीय सेनेने बदला घेतला. या मुद्यांवर मोदी नेहमीच छाती ठोकून बोलत असतात. आपल्या प्रचारासाठी या मुद्यांचा वापर करतात. निवडणूक आयोगाने या मुद्याचा वापर प्रचारात करण्यासाठी मनाई केली आहे. मात्र त्यापूर्वी मोदी आपल्या भाषणात नेहमीच आर्मी आणि भारतीय सुरक्षा दलांविषयी बोलत असतात. त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत असतात. तसंच याचे श्रेयही ते कधी-कधी घेऊन मोकळे होतात. मोदींनी राजकारणात सुरक्षा दलांचा वापर केला, मात्र भारताच्या आताच्या राजकारणात सुरक्षा दलातील असे काही लोक आहेत, जे आता लोकप्रतिनिधी आहेत. हे नेते आपल्या सुरक्षा दलातील कर्तृत्वाचे पाढे कधी गात नाहीत. त्यांनी राजकारणात सुरक्षा दलाला कधी आणले नाही. आज आशाच काही नेत्यांबद्दल थोडी माहिती घेऊयात

१ . अमरिंदर सिंह (काँग्रेस)

अमरिंदर सिंह हे आर्मीमध्ये कॅप्टन या पदावर कार्यरत होते. १९६३मध्ये ते सैन्यात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी १९६५मध्ये राजीनामाही दिला. मात्र १९६५मध्ये भारत-पाकमध्ये झालेल्या य़ुद्धावेळी ते सिख रेजिमेंटमध्ये कॅप्टन म्हणून पून्हा सामिल झाले होते. त्यानंतर राजीव गांधी यांनी अमरिंदर सिंह यांना काँग्रेसशी ओळख करून दिली. १९८०मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर नियुक्त झाले. त्यानंतर त्यांनी आपले समाजासाठी कार्य सुरुच ठेवले. लोकसभेवरून विधानसभेवर आले आणि मग २००२ते २००७ या काळात पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले. सध्या ते पंजाबचे विद्यामान मुख्यमंत्री आहेत. याशिवाय त्याने आपल्या राजकिय कारकिर्दीत अनेक पदे भूषविली आहेत. मात्र कॅप्टन अमरिंदर सिंह हे स्वतः सैन्यात असून त्यांनी कधीही राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर केला नाही.

२ . सचिन पायलट(काँग्रेस)

सचिन पायलट हे राजस्थानमधील दौसा मतदारसंघाचे खासदार आहेत. तसंच काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. पायलट हे महाविद्यालयात असताना विद्यालय शुटिंग दलाचे कप्तान होते. २००२मध्ये पायलट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००४मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर गेले. तेव्हा ते फक्त २६ वर्षांचे होते. त्यामुळे तेव्हा ते सर्वात लहान खासदार होते. पायलट गृह खात्याचे पार्लिमेंट स्टॅडींग समितीचे सदस्य आहेत. तसेच नागरी उड्डान खात्याच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. यांनीही कधी आपल्या सैन्यातील कामगिरीचा उल्लेख केला नाही.

३ . व्ही. के. सिंग (भाजप)

व्ही. के. सिंग हे भाजपचे नेते असून ते उत्तरप्रदेशमधील गाझीयाबाद लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. सिंह यांनी आयुष्य़ हे सैन्य दलात घालवले आहे. १९७० साली ते सैन्यात भरती झाले. त्यांनी त्यांच्या कारर्दीत अनेक जवान घडवले आहेत. तसंच मोठ्या कारवायांमध्ये उत्तम कामगिरीही केली आहे. २०१२ साली ते सैन्यातून निवृत्त झाले. तेव्हा त्यांच्याकडे ४ स्टार जनरल ही रँक होती. त्यानंतर ते समाजिक कामांमध्ये सहभाग घ्यायला लागले. मग २०१४ मध्ये भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले. त्यावर ते निवडणूही आले.

४ .  राज्यवर्धन सिंग राठोड (भाजप)

राज्यवर्धन सिंग राठोड हे सध्या जयपूर ग्रामीण मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी भारतीय सैन्य दलात काम करून कर्नल म्हणून २०१३मध्ये निवृत्त झाले. २०१४मध्ये ते लोकसभेवर गेले तिथं ते केंद्रीय क्रीडा मंत्रा आहेत, तर ते ती जबाबदारी उत्तम प्रकारे पूर्ण करत आहेत. राज्यवर्धन हे सैन्यात असताना पुरुष दुहेरी ट्रॅप इव्हेंटमध्ये २००४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तसंच डबल ट्रॅप नेमबाजीसाठी आंतरराष्ट्रीय स्तारावर एकूण २५ पदके जिंकली आहेत. त्यांच्या खेळाचा किंवा सैन्यात असण्याचा उल्लेख राजकारणात केला नाही.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment