आपल्या शिक्षणावर बोलताना स्मृती इराणींचा जुना व्हीडिओ; एकदा पहाच

मागील काही सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय म्हणजे मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अमेठीतून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून. कारण २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना पदवीधर असल्याचे म्हटले होते. ओपन लर्निंग विद्यापीठातून तीन वर्षांची पदवी घेल्याचे स्मृती इराणींनी म्हटलं होते. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता त्यामुळे वादही निर्माण झाले होते. तेव्हा इराणी पदवीधारक नसून त्यांनी ही माहिती खोटी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर काल स्मृती इराणी यांनी लोकसभेसाठी पुन्हा एकदा अर्ज केला.
२०१४ नंतर आता २०१९ च्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण पदवीधर नसल्याचे स्मृती इराणींनी म्हटलं आहे. २०१४ मध्ये पदवीधर असणाऱ्या इराणी २०१९ मध्ये पदवीधर नाहीत असं कसं काय, म्हणजे खोट नेमके काय, असं प्रश्न सर्वांना पडत आहेत. शिवाय काँग्रेसने या गोष्टीची खिल्लीही उडवली आहे.
आता स्मृती इराणींचा एक जुना व्हीडिओ समोर येत आहे. यात त्यांनी स्वतः आपण पदवीधर नसल्याचे सांगितलं होते. २०१४ मध्ये लोकसभा राहल्यानंतरही भाजपने त्यांना सत्तेत घेत मानव संसाधन विकास मंत्री पदावर नियुक्त केले होते. तरीही त्यांनी आपली शिक्षणाबद्दल अनेक वेगवेगळे दावे केले. तर कधी वादही घातला. सध्याचा वाद हा काहीसा तसाच आहे.
आताच्या व्हीडिओमध्ये इराणी यांनी येल विद्यापीठातून पदवी घेतल्याचे म्हटलं होते. मात्र नतंर त्यांनी माघार घेत ती पदवी नसून फक्त ६ दिवसांच्या अभ्यासक्रम प्रशिक्षणात भाग घेतल्याने खासदारांना मिळालेले प्रमाण पत्र होते, अशी कबुली दिली होती. २०१३मध्ये ११ खासदारांचा एक ग्रुप दुर्घटना अभ्यासक्रम शिकण्यासाठी येल येथे गेला होता. तेथील ते प्रमाण पत्र होते, हे समोर आले. त्यानंतर मात्र लोकांनी स्मृती इराणींनी केलेल्या दाव्यांना दुर्लक्षित केले.

 

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment