अनिर्बंध वृक्षतोडीमुळे सिमला शहर वाहून जाण्याचा धोका ?

सिमला : सतत होत असणारी वृक्षतोड व त्यामुळे खचणाऱ्या मातीमुळे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण असलेले शिमला शहर वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सिमला शहराचा कडा हा शहराची ओळख मानल्या जातो, या कड्याच्या उत्तरेकडील भागात अनिर्बंध वृक्षतोड झाल्याने माती चार ते पाच फूट खाली सरकली आहे, या भागावर थोड्याश्या धक्क्यानेही आता मोठी दुर्घटना घडू शकते.

सिमला शहरात गेटी थिएटरच्या बाजूला जमिनीत चार ते पाच फुटांची मोठी भेग काल आढळून आली आहे.

वृक्षतोडी सोबतच बेकायदेशीर बांधकाम आणि नव्याने बांधण्यात येणारा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा हे घटक देखील या संकटात नव्याने भर टाकत आहेत.

या कड्याच्या खालील भागात सिमला शहराला पाणीपुरवठा करणारा 97 लाख लिटर क्षमतेचा टॅंक आहे. ह्या भागात भूस्खलन झाल्यास हे हा जलसाठा सिमला शहरात मोठे नुकसान घडवू शकतो.

.

Leave a Comment