शिवसेनेनं केला कोकणचा आयर्लंड; सोशल मीडियावर ट्रोल

रत्नागिरी : लोकसभा निवडणूकीत प्रचाराचे वारे जोर धरत आहेत. प्रचारासाठी कोण कोणती शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. पोस्टर हे प्रचारासाठी महत्वाचे मानले जातात. त्यामुळे लोकांच्या नजरा नेत्यांच्या पोस्टरवर असतातच आणि त्यात ते काय काय वापरतात हेही लोक बारकाईने पाहतात, याची प्रचीती आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील विद्यमान खासदार आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हे आहेत. गेल्या ५ वर्षात कोकणातील विकास दाखवण्यासाठी यांनी एक जाहिरात केली होती. ती लोकांच्या डोळ्यात आली आहे.  ही जाहिरात म्हणजे एक पोस्टर आहे.

कोकणाचा विकास कसा झाला हे या जाहिरातीत दाखण्यात आले आहे. कोकणाचा विकास दाखताना मात्र त्यांनी पोस्टरवर चक्क आयर्लंडचे फोटो वापरण्यात आला आहे. हा फोटो आहे तो चार पदरी रसत्यांचा कोकणात मात्र असा रस्ता कोठेही नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी हा फोटो कुठला आहे, याची माहिती काढली. तर हा फोटो निघाला आयर्लंडच्या रस्त्यांचा. त्यामुळे  नेटकऱ्यांनी शिवसेनेनं कोकणाचा आयर्लंड केला म्हणून ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

जाहीरातीच्या पोस्टरवर  प्रगत कोकण शांत कोकण ही टॅगलाईन देण्यात आली आहे. तसंच या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह महायुतीतील नेत्यांचे फोटो आहेत. मोठ्या दिमाखात छापण्यात आलेल्या पोस्टरचा खोटारडेपणा उघड झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात आचारसंहितेमुळे सरकरा नवीन योजना आणी शकत नाही. मात्र हे जनतेला आश्वासने द्यायला काही मागे-पुढे बघत नाहीत. जनतेला आकर्षित करण्यासाठी जाहीरातबाजी करतात. मात्र या जाहीराती अशा फसव्या असल्या तर पक्ष जनतेची विश्वासहर्ता गमवत चालला आहे. त्यामुळे काही बोलण्यापुर्वी आणि काही करण्यापूर्वी नेत्यांना दहा वेळा विचार करावा लागतो.

दरम्यान,  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजप-शिवसेना युतीकडून विनायक राऊत असले तरी त्यांच्या विरोधात महाआघाडीकडून काँग्रेसचे नवीनचंद्र बंडीवाडेकर लढणार आहेत. तसंच वंचित बहुजन आघाडीकडूनही उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीत लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस दिसणार आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment