सहा लाखात आदित्य ठाकरेंना बीएमडब्ल्यू कशी मिळाली?

 

ठाकरे घराण्यातील कोणीतरी निवडणूक लढवत आहे हे महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचे आहे. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढणारे पहिले ठाकरे ठरणार आहेत. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. ते म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या बीएमडब्लू गाडीच्या किमतीमुळे . त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी बीएम डब्लू ची किंमत फक्त सहा लाख रुपये   दाखवली आहे. MH02CB1234 ही आदित्य यांची फाईव सिरीज बीएमडब्ल्यू. या गाडीची मूळ किंमत पन्नास लाख रुपये इतकी आहे.

 

 

 

 

मग प्रश्न असा पडतो की आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला खोटी आकडेवारी दिली का?

तर तसे नाहीये ठाकरे याच्याकडे असलेली गाडी २०१० सालची आहे. तिला ८ वर्ष ९ महिने आणि २७ दिवस झाले आहेत.
लक्झरी गाड्यांची किंमत जशी जास्त असते तसच त्यांचा घसारा दर ही जास्त असतो. एकदा का तुम्ही गाडी घेतली की पहिल्याच वर्षी तिची किंमत वीस टक्क्यांनी कमी होते.

त्यानंतर प्रत्येक वर्षी ही किंमत १५ टक्क्यांनी कमी होत जाते. याचा अर्थ असा की पहिल्याच वर्षी या गाडीची किंमत दहा लाखांनी कमी झाली. त्यानंतर सात वर्ष दर वर्षी पंधरा टक्के कमी होत गेली. चाळीस लाखाचे १५ टक्के सहा लाख होतात त्यामुळे गाडीची किंमत ३४ लाख झाली. पुढच्या वर्षी ५१०००० कमी झाले गाडीची किंमत झाली २८९००००.

अशा प्रकारे गणित मांडत गेल्यास आज घडीला गाडीची किंमत १२ लाख ८२ हजार असायला हवी होती. मग तरीही आदित्य ठाकरेंनी गाडीची किंमत सहा लाख का दाखवली? तर त्याचं कारण असं की, गाडी आदित्य ठाकरे यांनी मागच्याच वर्षी ही गाडी सेकंड हॅन्ड विकत घेतली आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिची किंमत सहा लाख रुपये दाखवण्यात आली आहे.

.

Leave a Comment