पवार राणे भेटीने चर्चांना उधाण; कोकणात राष्ट्रवादीची नवी इनिंग?

मुंबई : राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल कोकण दौरा आटोपून परतत असताना अचानक नारायण राणे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन पाहुणचार स्वीकारल्यामुळे राज्यातील सर्वच पक्षीय नेत्यांच्या    भुवया उंचावल्या आहेत. स्वाभिमानी पक्षाचे संस्थापाक अध्यक्ष असलेले नारायण राणे हे भाजपच्या गोटात आहेत. परंतु शिवसेना हा त्यांचा स्वाभाविक  राजकीय शत्रू राहिला असल्याने सेना भाजपची वाढती जवळीक पाहता नारायण राणे यांनी आज   शरद पवारांच्याघेतलेल्या भेटीने अनेक चर्चा आता    रंगत आहेत.

२ दिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर असलेले पवार सोमवारी आंबोली, मालवण, वेंगुर्ला येथील बैठका व कार्यक्रम   आटोपून मुंबईकडे परतत असताना अचानक त्यांनी नारायण राणे यांच्या ओम  गणेश निवास्थानाकाडे आपला ताफा वळवला. संपूर्ण  राणे कुटुंब या Heavy Weight पाहुण्याच्या स्वागतासाठी उभे होते. शरद पवार यांच्या सह त्यांचे तीन नातू पार्थ पवार,  युगेंद्र पवार, रोहित पवार हे ही या कोकण दौर्यात होते. राणे आणि पवार कुटुंब जुने  सहकारी व मित्र असल्याने इथे कोणतीही    राजकीय बातमी आपल्याला मिळणार नसून नारायण राणे यांनी फोन करून आमंत्रित केल्याने आपण आज सहज   आल्याचे शरद पवार यांनी माध्यमांना सांगितले.

राज्यात आणि देशात येत्या वर्षभरात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राणे आणि पवार यांच्या भेटीकडे पाहिल्यास राणे आपल्या चिरंजीवांच्या राजकीय सेटलमेंट साठी पवारांकडे गळ घालत असल्याचे जाणकारांचे मत आहे. राष्ट्रवादी कांग्रेसच्या कोट्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या जागेची मागणी नारायण राणे आपल्या चिरंजीवांसाठी करू शकतात असे हि त्यांचे मत आहे. तसेच राष्ट्रवादी कांग्रेसला कोकणात विस्तारासाठी याचा फायदाच होईल असे दिसत आहे. असे असले तरी येत्या काळात काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment