…तर जाणार तुरुंगात….अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका !

एरिक्सन इंडिया ने अनिल अंबानी व इतर दोन थकबाकीदारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानींना ४३० कोटी रुपये थकबाकी
एरिक्सन इंडिया ला येत्या ४ आठवड्यात भरण्याची मुदत दिली आहे. या मुदतीत अंबानी यांनी हि थकबाकी भरली नाही तर त्यांना तीन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्यात न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीला १५ डिसेंबर पर्यंतची मुदत दिलेली होती. यानंतर कंपनीने ६० दिवसांची मुदत वाढवून मागितली होती.

हि मुदत संपून देखील अंबानींनी थकबाकी न भरल्याने पुन्हा एकदा एरिक्सन इंडिया या कंपनीने अनिल अंबानी यांच्या विरोधात हि याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
याबरोबरच, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अनिल अंबानी व इतर दोन थकबाकीदारांना १ कोटी रुपये दंड सुनावला आहे, हि दंडाची रक्कम देखील न्यायालयात येत्या चार आठवड्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हि दंड स्वरूपातील रक्कम मुदतीत न भरल्याच एका महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

रिलायन्स कॅम्युनिकेशन चे प्रमुख अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीकडे राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदी करिता पैसे आहेत, परंतु, एरिक्सन इंडियाला थकबाकी देण्याकरिता पैसे नाहीत का? असा आरोप या सुनावणी दरम्यान एरिक्सन इंडियाचे वकील दुष्यंत दवे यांनी अंबानीवर केला होता.

नुकतेच अनिल अंबानी यांनी १ फेब्रुवारी ला रिलायन्स कॅम्युनिकेशन हि त्यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली असल्याचे जाहीर केले आहे.
कंपनी दिवाळखोरीत निघालेली असताना, थकबाकी शिल्लक असताना अनिल अंबानींकडे राफेल खरेदीसाठी पैसे कुठून आले? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांचे मत घेतले असता त्यांनी, ‘अनिल अंबानीला वाचवण्यासाठीच त्याला राफेलच कंत्राट दिलेलं होत आता तो हे कंत्राट विकून किवा त्यातून पैसे उभे करून हि थकबाकी पूर्ण करेल.’ असे सांगितले.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment