संघ – भाजपच्या मुखपत्राची ‛ओबीसी’ विरोधी टिप्पणी, लोक संतप्त

कोची : संघपरिवार व भारतीय जनता पक्ष जन्मभूमी या नावाने एक मुखपत्र चालवतात, दक्षिण भारतात, प्रामुख्याने केरळ या राज्यात हे मुखपत्र प्रसिद्ध आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या जातीचा तुच्छतापूर्वक उल्लेख केल्याने हे मुखपत्र अडचणीत आले आहे. साबरीमला विवादात संघपरिवाराने पिनाराई विजयन यांच्याविरोधात एक मोठी आघाडी उघडली आहे.

साबरीमला च्या अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी विजयन करत असल्याने ते संघपरिवाराच्या हिटलिस्टवर आले आहेत. अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात आला तर राज्यभर अस्थिरता माजेल असा इशाराही भाजपच्या नेत्यांनी दिला आहे.

या व्यंगचित्रात दोन उच्चवर्णीय पेपरात साबरीमला प्रकरणाची बातमी वाचताना दाखवले आहेत व समोरून पिनाराई विजयन जात आहेत असं दाखवलं आहे. “ज्याने नारळाच्या झाडावर चढायला हवं, त्याला मुख्यमंत्री केलं तर असंच होणार” असे संवाद त्या दोन व्यक्तींच्या तोंडी दाखवले आहेत. मुख्यमंत्री विजयन हे एझवा (थिय्या) जातीचे असून नारळाच्या झाडावर चढणे व ताडी गोळा करणे हा या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. ज्या त्या जातीने आपापला परंपरागत व्यवसायच करायला हवा ही संघाची संकुचित दृष्टी या व्यंगचित्रातून पुढे आलेली आहे. ही जात ओबीसी प्रवर्गात मोडते. 22 डिसेंम्बर रोजी हे व्यंगचित्र प्रकाशित झाले होते.

“आजकाल मला माझ्या जातीची आठवण फारच प्रकर्षाने करून दिली जाते,” असे उद्गार मुख्यमंत्री विजयन यांनी या प्रकरणानंतर काढले. माझे वडील, मोठा भाऊ ताडी काढण्याचं काम करायचे, मीही तेच करायला हवं होतं अशी काही लोकांची समजूत आहे असंही ते म्हणाले. एक नारळाची झाडं चढणारा माणूस मुख्यमंत्री होतो हे संघाला सहन न होणारं आहे असा प्रतिवाद सिपीएम ने केला आहे.

पंतप्रधान मोदी हे ओबीसी असल्याचा सूचक उल्लेख वारंवार संघाशी संबंधित लोकांकडून करण्यात येतो, उत्तरेतील बहुतांश राज्यांत भाजपचं राजकारण हे ओबीसी जातींवर आधारित आहे, असं असताना ओबीसी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जातीवरून संघानेच हिनवल्याने एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान हे व्यंगचित्र काढणाऱ्या व्यंगचित्रकाराला जन्मभूमीने बडतर्फ केले आहे अशी पोस्ट जन्मभूमी दैनिकाच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आली होती, मात्र ती आता डिलीट करण्यात आली आहे. हे व्यंगचित्र अजूनही जन्मभूमीच्या इ पेपर वर दिसते आहे.
http://epaper.janmabhumidaily.com/m5/1947880/Kollam/22-December-2018#page/2/1

महाराष्ट्रात शिवसेनेने मराठा समाजाच्या मूक मोर्चाची संभावना ‛मुका मोर्चा’ अशी केली होती. मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी असलेल्या या मोर्चाची अशी खिल्ली उडवल्याने समाजमन तेव्हाही संतप्त झाले होते.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment