पार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री!!!

पुणे : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘बाप माणूस’ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. त्यांना राजकारणातील ‘चाणाक्य’ म्हटलं जाते. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे राजकारणातील वावर पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हे सर्वांसाठी केंद्रच बनले आहे. त्यांच्या सोबत असणारे कौतुक करतात तर विरोधक त्यांच्यावर टीका केल्याशिवाय शांत होत नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार निवडणूक लढवणार की नाही या चर्चांना उधाण आले होते. खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर एकाच घरातून लोकसभेला किती उमेदावर उतारावेत याला मर्यादा असावी, असं कारण देत पवार यांनी आपली माढ्यात दिलेली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघातून त्यांचे नातू पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. पवारांची तिसरी पिढी राजकारणात उतरताना पाहून विरोधकांसह पत्रकारांच्या नजराही पवार कुटुंबावर होत्या. पार्थनंतर आता रोहित पवार हे राजकारणाच्या रिंगणात उतरणार आहेत.
रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ही माहिती त्यांनी स्वतः एका वृत्तपत्रला दिली आहे. आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहोत, मात्र अद्याप मतदारसंघ ठरला नाही, असे रोहित पवार यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला ४८ पैकी २३ जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी सांगितला.
रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून बारामतीचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना पुण्यातील परिस्थितीचे चांगले ज्ञान आहे. पुण्यात पाण्याचे योग्य नियोजन नाही. नियोजना अभावी पुण्यात पाणी टंचाई सारख्या समस्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, रोहित पवार हे पवार कुटुंबातील सदस्य असून पार्थ पवारांचे चुलत भाऊ आहे. राजेंद्र पवार यांचे सुपुत्र तर पद्मश्री अप्पासाहेब पवार यांचे नीतू आहेत. त्यांच्या नावात पवार हे आडनाव जोडले गेल्याने त्यांच्यावर नावाचीच पहिली जबाबदारी आहे. तसं रोहीत पवार हे शरद पवार यांचेही नातूच आहेत. त्यांच्याकडे आपल्या आजोबाची शेतीविषयक असलेली माहिती, ज्ञान आहे. त्यामुळे ते या नावाचा भार राजकारणात सक्रियपणे संभाळतील यात शंका नाही. त्यांच्या येण्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसंच रोहित पवार विधानसभा लढवताना कोणत्या मतदार संघातून मैदानात उतराणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे याचीही उत्सुकता सर्वत्र दिसून येत आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment