जिओचे फ्री कॉल आजपासून बंद.

आज पासून जिओने फ्री कॉल्स बंद केले आहेत. जिओ च्या कार्ड वरून इतर कोणत्याही कार्डवर कॉल केल्यास आज पासून मिनिटाला सहा पैसे प्रमाणे कॉल पडणार आहे.

जिओ बाजारात आल्यापासून टेलिकॉम क्षेत्रात बरीच क्रांती घडली. जिओने  कॉलिंग व 4G डेटा जवळपास मोफत वाटायला सुरुवात केली. त्यामुळे ग्राहक जिओकडे आपसूकच ओढला गेला. ज्याचा फटका बीएसएनएल, एमटीएनएल, एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया सारख्या इतर टेलिकॉम कंपन्यांना बसला. जिओ ने मोफत डेटा व कॉल सेवा सुरू केल्याने या कंपन्यांना जिओशी स्पर्धा करणे कठीण होऊन बसले.

बीएसएनएल तर आज बंद होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कंपन्यांनी सतत त्यांनी आपली बाजू ट्राय (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) कडे लावून धरली होती. पण बराच काळ त्यावर काही कारवाई झालेली नव्हती.

आज घडीला भारतात नफ्यात असणारी जिओ ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहे. सत्तारूढ पक्षाने जिओला सर्वतोपरी सर्व मदत केली. जिओने एकूण एक लाख पन्नास हजार कोटी इतकी गुंतवणूक करून कंपनी सुरु केली होती. त्या पैकी एक लाख पंचवीस हजार कोटी सरकारी बँकांकडून कर्ज म्हणून घेतले आहेत.आज जिओची दोन लाख कोटींची थकबाकी सरकारी बँकांकडे आहे. 

पंतप्रधानांनी तर जिओचे ब्रँडिंग उघडपणे केले. या मुळे अत्यंत कमी काळात जिओ ने मार्केटमध्ये मोनोपॉली तयार केली. आज घडीला जिओचे ३२ कोटीहून अधिक ग्राहक आहेत. तर आज घडीला रिलायन्स जीओही भारतातली एक नंबर, तर जगातली तीन नंबरची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे.

जिओ च्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की टेलिकॉम रेग्युलेटरी ’अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ने १जानेवारी, २०२० पासून इंटरकनेक्ट वापर शुल्क IUC रद्द करण्याच्या तारखेचा आढावा घेतल्यानंतर आम्हाला मोफत सेवा बंद करणं भाग पडलं.

इनकमिंग कॉल मध्ये जेव्हा बीएसएनएल किंवा इतर कोणत्याही कंपनीचा कॉलर जिओ ला कॅल करतो तेव्हा जिओला मिनिटाचे १४ पैसे बीएसएनएल किंवा तत्सम कंपनीला देणं बंधनकारक होतं. पण जिओने सरकारकडून तो दर ६ पैसे इतका करून घेतला, होता आणि या मुळे सरकार आणि बीएसएनएल यांचे पाच हजार कोटीचे नुकसान झाले. मात्र जिओचा पाच हजार कोटीचा फायदा झाला.

जिओचे असे म्हणणे आहे की एअरटेल, आयडिया सारख्या नेटवर्क वरून जिओला ग्राहक फक्त मिस कॉल देतात. त्यानंतर जिओचा ग्राहक त्यांना फोन करतो. एकूण कॉल्सच्या ६४% कॉल जिओचे आउटगोइंग आहेत. त्यामुळे हा नियम आमच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे. तरीही ट्रायच्या सर्व निर्देशांचे आम्ही पालन करू.

जिओ ग्राहकांनी आजपासून सुरू केलेल्या सर्व रिचार्जसाठी अन्य मोबाईल ऑपरेटरना केलेल्या कॉलवर आययूसीच्या टॉप-अप व्हाउचरच्या माध्यमातून सध्याच्या आययूसी दराने प्रति मिनिट ६ पैसे दराने शुल्क आकारले जाईल, जोपर्यंत ट्राई शून्य समाप्ती शुल्काकडे जाणार नाही तोवर ही आकारणी सुरूच राहील ,” असं जिओने बुधवारी काढलेल्या निवेदनात म्हणाले आहे.

.

Leave a Comment