जागतिक मंदीचा फटका भारताला जास्त बसेल – IMF प्रमुख.

जग सध्या आर्थिक मंदीला तोंड देत आहे.त्यात भारतासारख्या विकसनशील देशाला याचा मोठा फटका बसेल.

भारतीय बाजारपेठांमध्ये मंदीचे परिणाम याच वर्षी दिसू लागतील असं मत, क्रिस्टालिना गॉर्जिवा (आंतराष्ट्रीय नाणेनिधी संथा IMF च्या व्यवस्थापकीय संचालक)यांनी व्यक्त केलं आहे.

युरोप व अमेरिका खंडातील अनेक देश मंदीने होरपळत आहेत. जर्मनी आणि अमेरिकेत बेरोजगारीने परिसिमा गाठली आहे. युरोप मधील विकसित देशांसहित जपानचा ही आर्थिक वेग मंदावला आहे. येणाऱ्या काळात जागतिक विकास दर दहा वर्षाच्या नीचांक पातळीवर येईल असं ही त्या म्हणाल्या. सध्या ९० टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागत आहे.

दोन वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्था समक्रमित प्रगतीमध्ये होती. जीडीपी द्वारे मोजले गेलेले जगातील जवळपास ७५ टक्के देशच आर्थिक प्रगती करत आहेत .

जागतिक अर्थव्यवस्था आता संकालित मंदीच्या स्थितीत आहे. २०१९ मध्ये  जवळपास ९० टक्के देशांना मंदीचा सामना करावा लागेल.” असे श्रीमती जॉर्जिवा यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात सांगितले.

जागतिक व्यापार वाढ आत्ता जवळपास थांबली आहे. भारतात देशाअंतर्गत मागणी कमी झाल्याने अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा कमकुवत दिसत आहे, त्यामुळेच IMF ने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज चालु वर्षात सात टक्क्यांनी कमी पकडला आहे.

सर्वसाधारणपणे दर आणि काउंटर-टेरिफच्या माध्यमातून आंतराष्ट्रीय पातळीवर देशांमध्ये व्यापार युद्ध चालु असते , IMF प्रमुखांनी सर्व राष्ट्रांना एकत्र काम करण्यास सांगितले शेवटी त्या म्हणाल्या “ व्यापार युद्धात कोणाचाच फायदा होत नाही ”.

.

Leave a Comment