चिंताजनक!!! देशातील श्रीमंतांचा लोंढा भारताबाहेर स्थलांतरित होतोय

नवी दिल्ली : सध्या भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसीत होत आहे. जागतिक पातळीवर भारताची औद्योगिक प्रतिमा चांगली होतं आहे. अनेक देश व्यापारासाठी भारतातील उद्योगात गुंतवणुक करत आहेत. हे आपल्यासाठी आभिमानाची गोष्ट आहे. यासोबतच भारतासाठी एक चिंताही दिवसेंदिवस वाढत आहे. देश प्रगतीपथावर असला तरी देशातील अनेक करोडपती आणि श्रीमंत व्यक्ती देश सोडून जातत आहे. देश सोडून जाणाऱ्यांची संख्या ही वाढतच आहे.
अफरासिया बँक आणि खर्म न्यू वर्ल्ड वेल्थने ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्ह्यू 2019 चा अहवाल सादर केला आहे. त्यात गेल्या वर्षभरात श्रीमंत भारतीय देशाबाहेर जाण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पूर्वी शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. यावर अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आता देशातील करोडपती आणि अतिश्रीमंत व्यक्ती देशाबाहेर जात आहेत. त्यांच्या या स्थालांतराबाबत चिंता उपस्थित होत आहे. देशातील कर्तृत्ववान, सक्षम आणि कौशल्य असलेले विद्यार्थी देशाबाहेर गेल्याने देशाचे नुकसान तर होत आहे. तसंच देशातील अनेक लोक कामासाठी परदेशात जातात. त्यामुळे देशात लागणारे मनुष्यबळही कमी होत आहे. देशाबाहेर जाणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
कामासाठी परदेशात जाणाऱ्या तरूण वर्गाला रोखण्यासाठी भारतातच त्यांच्या क्षेत्रात चांगल्या संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांचा हातभार दुसऱ्या देशांच्या कामात न लागता आपल्या देशाच्या कामी लागेल. त्यासाठी अशा तरुणांना देशातच त्यांच्या क्षेत्रातील संधी निर्माण करुन देण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या उपायायजोना करुन ब्रेनड्रेन रोखता येईल. मात्र, देशातील करोडपती आणि श्रीमंत व्यक्ती देशाबाहेर जात असल्याने देशातील पैसैही मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहे. ही चिंतेची बाब आहे. देशातील श्रीमंत वर्गाचा मोठा वर्ग बाहेर का जात आहे, याचा विचार करण्याची गरज आहे.
अफरासिया बँक आणि खर्म न्यू वर्ल्ड वेल्थने दिलेल्या ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्ह्यू अहवालानुसार गेल्या वर्षभरात श्रीमंत भारतीयांची देशाबाहेर जाण्याची संख्या वाढली आहे. करोडपती आणि देशातील अतिश्रीमंत व्यक्तीपैकी 5000 जणांनी देश सोडल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. तर २०१७ पर्यंत देश सोडून ब्रिटनमध्ये स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते. मात्र, सध्या तिथे ब्रक्झिटमुळे तेथे अनिश्चततेचे वातावरण आहे त्यामुळे तेथे जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थ व्यवस्थेवरही होऊ शकतो. या अहवालानुसार भारतासह चीन आणि रशियातील नागरिकही मोठ्या प्रमाणात देश सोडत आहेत.

.

Leave a Comment