आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांना नोटीस. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

दिल्ली: नोटबंदी व त्यानंतर ढासळलेली अर्थव्यवस्था कर्जबुडवे उद्योजक यामुळे अडचणीत आलेली रिजर्व बँक आज पुन्हा चर्चेचा विषय आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना केंद्रीय माहिती आयोगाने नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचे पालन न केल्याने त्यांना ही नोटीस बजावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 50 कोटी रुपये व त्यापेक्षा जास्त कर्ज घेतलेले व ती बुडवलेल्या कर्जदारांची यादी जाहीर करण्यात यावी. या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे साहस गव्हर्नर उर्जित पटेलांनी केले होते.त्यामुळे आज त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि आरबीआयने, बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे बुडीत कर्जाबाबतचे पत्र सार्वजनिक करावे, अशा सूचनाही माहिती आयोगाने दिल्या आहेत.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment