अर्थसंकल्पाची होणार चिरफाड-रत्नाकर महाजन

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हे प्रकृतीच्या कारणाने अनुपस्थितीत असल्याने अर्थमंत्रालयाची जबाबदारी पाहणाऱ्या हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मध्यमवर्गीय नोकरदार वर्गासाठी काही घोषणा आणि भावी काळासाठीच्या काही तरतुदी मांडत गोयल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. ज्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

गोयल यांनी काल मांडलेल्या या अर्थसंकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कोणतीच संवैधानिक तरतूद नसल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

ऍड. मनोहर लाल शर्मा यांनी हि याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. पियुष गोयल यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या काही तासानंतरच हि याचिका दाखल करण्यात आली आहे.

गोयल यानी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतीही संवैधानिक तरतूद नसून त्यात फक्त पूर्ण अर्थसंकल्प आणि व्होट ऑन अकाऊंटचीच तरतूद करण्यात आली असल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं गेलं आहे.

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुढील ठराविक काळासाठी सत्तेत असणाऱ्या सरकारसाठी व्होट ऑन अकाऊंटची परवानगी घेण्यात येते. ज्यानंतर नवनिर्वाचित सरकारकडून येत्या वर्षासाठीच्या संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात येतो. त्यामुळे या दाखल केलेल्या याचिकेवर काय सुनावणी करण्यात येते हे महत्वाचे आहे.

या अर्थसंकल्पाच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात रत्नाकर महाजन यांनी “न्यायालयाला अर्थसंकल्पात कितपत हस्तक्षेप करता येतोय, हे सांगता येत नाही परंतु, सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला याविरोधात दाखल झालेल्या याचिकेमुळे नक्कीच अर्थसंकल्पाची चिरफाड होणार आहे, आणि सरकारच्या आतापर्यंतच्या भूमिकेची देखील चिरफाड होणार असून हि चांगली बाब असल्याचे”, मत व्यक्त केले.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment