“भारताची” प्रकृती चिंताजनक. राज ठाकरेंची बोचर व्यंगचित्र

मुंबई: दिवाळीच्या धामधुमीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नवीन व्यंगचित्र आज प्रदर्शित झाले.

धनत्रयोदशी हे वैद्यकीय शास्त्राचे देव धन्वंतरीचे जन्मदिवस म्हणून मानला जातो. याच धाग्याला पकडून राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रारात भारत देश हा आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मागील चार वर्षांपासून त्याच्यावर अनेक अत्याचार झाले आहेत. त्यामुळे त्याची मरणासन्न अवस्था झाली असून त्याच्या तब्येतीत लोकसभेनंतर सुधारणा होऊ शकते असे म्हणले आहे.

दिवाळीच्या सणामध्ये आपल्यासाठी व्यंगचित्र घेऊन येत आहे असे कालच राज  ठाकरे यांनी जाहीर केले होते त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात आणखी सणसणीत फटकेबाजी ठाकरेंच्या कुंचल्यातून पहायला मिळेल असे वाटत आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment