राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना त्यांच्याच मंचावर जाऊन सुनावले

मुंबई- महाराष्ट्रात रोजगार असतील तर आधी राज्यातील तरुणांना त्याची संधी मिळाली पाहिजे, त्यानंतर काही उरले तर बाकीच्यांना द्यावं, अशा कडक भाषेत राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांसमोर त्यांची मराठी बद्दलची भुमिका मांडली.

मुंबईतील कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. आपल्या भाषणाची सुरवात राज यांनी हिंदीतुन केली. आपली भुमिका सर्व उत्तर भारतीयांना व्यवस्थित समजावी यासाठी हिंदीतुन बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मंचावर जाण्यास होकार दिला त्या दिवसापासून राज तेथे काय बोलतील यावर सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. मनसेची स्थापना झाल्यापासून राज यांच्या पक्षाची आंदोलन, मधल्या काळात रेल्वे भरती वेळी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना झालेली मारहाण या सगळ्या पार्श्वभुमीवर राज उत्तर भारतीयांसमोर काय बोलणार याचे कुतुहुल अनेकांना होते. राज यांनी मात्र आपल्या भुमिकेवर ठाम राहत मराठीचा आग्रह करण्यामागचे कारण या निमित्ताने ठोसपणे मांडले.

या देशातील व्यक्ती एका राज्यातुन दुसऱ्या राज्यात जाऊ शकते, संविधानाने तसा अधिकार त्यांना दिला आहे असे अनेक जण बोलतात मात्र हा कायदा लोकांनी अर्धवट वाचला आहे, असे राज म्हणाले. दुसऱ्या राज्यात आल्यावर पोलीस ठाण्याला माहिती द्यावी लागते, ते अनेक जण करत नाही त्यामुळे समस्या निर्माण होते, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंचे संपुर्ण भाषण :

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment