‘त्या’ वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर ट्रोल

नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणूकांचे वारे जोरदार वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेत विरोधकांवर अनेक टीका टिपण्ण्या केल्या. अनेक मुद्यांवर बोलत आपल्या भाषणातून अनेकांची बोलती बंद केली. अनेक वाहिन्यांना आपल्या मुलाखती दिल्या.त्यातील एका मुलाखतीत मोदींनी केलेले एक वक्तव्य केले आहे. ज्यावरून सोशल मीडियामध्ये त्यांची खिल्ली उडवली जात आहे. नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राईकच्या दिवशी असणाऱ्या हवामानावर भाष्य केले. बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अचानक हवामान खराब झाले. त्यामुळे अशा स्थितीत भारतीय वैमानिक पाकिस्तान सीमेत दाखल होतील का यावर संशय होता. त्यातच वैज्ञानिकांनी सर्जिकल स्ट्राईकची तारिख बदलण्यास सांगितले. मात्र माझ्या डोक्यात दोन विषय होते, एक म्हणजे गुप्तता आणि दुसरी म्हणजे आपण काही फार मोठे वैज्ञानिक नाही. मात्र त्यानंतर मी म्हणालो की, एवढ्या मोठ्या प्रमाणात आभाळ आणि पाऊस असेल तर त्याचा आपल्याला लाभही होऊ शकतो. त्यामुळे आपण पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाही. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल, असं आपण सांगितले. त्यामुळे सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेले आहे, चला पुढे जाऊ या…, असं मोदींनी या मुलाखतीत म्हटलं.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. तसंच यावरून अनेक विनोदही सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. तर अनेकांना यावर हसू आवरले नाही.

https://twitter.com/Chowkid40569779/status/1127560269326999552

.

Leave a Comment