मोदींची ‘ती’ मुलाखत पूर्वलिखित होती; काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणे नेहमी चर्चेत असतात. मात्र सध्या त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीत मोदींनी बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकबद्दल माहिती दिली, त्यावरू ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. त्यानंतर आता त्यांची ही मुलाखत ठरवलेली होती. त्यातील प्रश्न ठरवून विचारण्यात आले होते. तसंच मुलाखतीचे कथानकही आधीच ठरवलेले होते, असं गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून हे आरोप केले आहेत.

दिव्या यांनी आरोप करताना या मुलाखतीचा काही भागही टाकला आहे. मुलाखतीचे प्रश्न आधीच ठरले होते असा आरोप करत, आता आम्हाला कळलं की मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत खुली चर्चा का करत नाहीत, असा टोलाही लगावला. शेअर केलेला व्हीडिओ पाहताना त्यांनी लोकांना तिसऱ्या सेकंदाला थांबून त्यांच्या हातातील कागद पाहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मोदींच्या हातात काही कागद दिसत असून त्यावर हिंदीतून कविता छापलेली दिसत आहे, तसंच ‘सवाल संख्या २७’ असं दिसतंय. तसंच कवितेच्या वरती काही प्रश्न लिहिलेले दिसतायेत आणि तेच प्रश्न मुलाखत घेताना विचारण्यात आले होते, अशी टीका मोदींवर त्यांनी केली आहे.

दरम्यान, या मुलाखतीत मोदींनी बालाकोट एअर स्ट्राइक करतेवेळी ढगाळ वातावरणामुळे ही मोहिम पुढे ढकलण्याच्या विचारात होतो. पण ढगाळ वातावरणाचा आपल्या विमानांना रडारपासून वाचण्यासाठी फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता, असं वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरून त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत होती.

https://twitter.com/divyaspandana/status/1127641755241697280

.

Leave a Comment