जीएसटी आणि नोटबंदीमुळे पतंजली बुडणार? ..

देशात आर्थिक मंदी आहे व्यापार,उद्योग बर्याच अडचणीत आहे. अनेक कंपन्यांनी कामगार कमी करण्यास सुरवात केली आहे. बाजारात मागणी नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. या आर्थिक संकटा पासून कोणत्याच क्षेत्रातील उद्योग धंदा वाचलेला नाही. रामदेव बाबांचा स्वदेशी ब्रॉड पतंजली ही जीएसटी आणि नोटबंदीमुळे अडचणीत आला आहे. पतंजलीने फास्ट मुविंग कंझ्युमर गुड्स ज्याला आपण FMCG म्हणतो त्यावर अल्पावधीत चांगलीच पकड बसवली होती. हिदुस्तान युनिलीवर नंतर या सेक्टर मध्ये भारतातील दोन नंबरची कंपनी पतंजली आहे. इतकं सर्व असून सुध्दा पतंजली अडचणीत आली आहे.

चालू आर्थिक वर्षात पतंजलीची विक्री २.७% शहरी भागात कमी झाली आहे. तर कंपनीची ग्रामीण भागातील विक्री १५.७% इतकी आहे. एकाच वर्षा आधी कंपनीचं वाढीचा दर २१.१% शहरी भागात तर ग्रामीण भागात ४५.२%इतका होता. जो आत्ता कमालीचा कोलमडला आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात वर्षात पतंजलीने १०००० कोटींची विक्री केली होती. पुढच्या वर्षी आमचा सेल डबल म्हणजेच २०००० कोटी इतका होईल असा कंपनीने दावा केला होता पण त्या वर्षी ८१०० कोटी इतकीच विक्री झाली.

 

दिल्लीतील कनॉट प्लेस या ठिकाणी पतंजली चिकित्सालय आहे,इथे लोकांची नेहमी रेलचेल असायची तेच आत्ता ओस पडले आहे.त्याच बरोबर दिल्लीतील गोले आणि करोलबाग मार्केट मध्ये कंपनीची विक्री कमालीची घटली आहे. पतंजलीच्या मिडिया पर्सन एस.के.तीजार्वाला असे म्हणाले की आम्ही २०२१ पर्यत पूर्णपणे पूर्व पदावर येऊ. इतरान प्रमाणेच आम्ही पण  नोटबंदी आणि जीएसटीचे दुष्परिणाम भोगत आहोत. त्यात आम्ही इतर स्पर्धकांपेक्षा बाजारात नवीन आहोत त्यामुळे तर नोटबंदी आणि जीएसटीची आम्हाला जास्तीच झळ बसली आहे. मोदी सरकारने पतंजलीला सर्व बाबतीत मदत केली होती. कमी पैश्यात जमीन मिळवून देण्यापासून ते सर्व गोष्टी पतंजली साठी सध्याच्या सरकारने सुलभ होतील याची काळजी घेतली होती.

“आम्ही मार्केट मध्ये सप्लाय सुरळीत ठेवण्यास कमी पडलो त्यामुळे आमचे बरेच नुकसान झाले आहे. गेल्या वर्षभरात आम्ही एकही नवीन प्रोडक्ट बाजारात आणलेलं नाही.त्यामुळे आमच्या जाहिरातीही आम्हाला कमी कराव्या लागल्या आहेत” 

कंपनीचा  माणूस जरी असं म्हणत असला तरी तज्ञांचे म्हणणे वेगळे आहे कंपनी या अडचणीतून बाहेर पडेल असे मला वाटत नाही असे मत तज्ञ अरविंद सिंघल यांनी मांडले आहे.करणे विचारताच ते म्हणाले कंपनी अडचणीत येण्यामागे मंदी नाही तर कंपनीचे स्वतःचे चुकीचे नियोजन आहे. अवास्तव विस्तार, चुकीची वितरण साखळी आणि वाईट दर्जाचे उत्पादन या सर्व गोष्टी पतंजलीच्या अडचणांसाठी जवाबदार आहेत.

आजवर कंपनीने जो ग्राहक खेचला तो फक्त आणि फक्त जाहिरातीच्या जोरावर खेचला. कंपनीने गरजेपेक्षा जास्ती खर्च जाहिरातींवर केला लोक ही काही तरी नवीन ट्राय करण्यासाठी खरेदी करू लागले. वाढनारे ग्राहक पाहून किरकोळ विक्रेते, रिटेलर्स खुश झाले. इथे कंपनीने एक गफलत केली ती म्हणजे  दर्जा नियंत्रण ठेवण्यास कंपनी कमी पडली.
या सेक्टर मध्ये बाकीचे प्रतिस्पर्धी मजबूत असल्याने त्यांचे प्रोडक्ट्स ही तितकेच दर्जेदार आहेत. लोकांनी पतंजलीला नाकारून लगेच परत पारंपारिक चालत आलेल्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स वापरायला सुरवात केली. पतंजलीला क्वालिटी आणि वितरणाचे नेटवर्क दोन्ही सुधरावे लागेल. तसे न झाल्यास पतंजलीसाठी येणारा काळ अत्यंत कठीण असणार आहे. जीएसटी आणि नोटबंदीचे दुष्परिणाम उघडपणे  मान्य करणे पतंजली टाळत होती पण आता कंपनीच  आर्थिक अडचणीत आल्यामुळे त्यांना मान्य करणे भाग पडले.

.

Leave a Comment