भैयुजी महाराजांची आत्महत्या

भैयुजी महाराजांची आत्महत्या

भैयुजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. इंदूरमधील बॉम्बे रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले मात्र त्यांच्यावर उपचार होण्याआधीच त्यांचे निधन झाले. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजले नसून कौटुंबिक वादातून त्यांनी हे कृत्य केले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशभरातून त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.

पुढे वाचा ..

बाप बाप होता है ! – सुरेश धस

बाप बाप होता है ! – सुरेश धस

सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना धक्का उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणुकीमध्ये सुरेश धस यांनी ७८ मतांनी विजय मिळवून बाप बाप होता है असे विधान त्यांनी धनंजय मुंडेना उद्देशून केले. प्रतिष्ठेचा विषय ठरलेल्या या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांना पराभव पत्करावा लागला. या लढाईमध्ये कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संख्याबळ कमी असतानाही सुरेश धस यांचा ७८ मतांनी विजय झाला. यावेळी पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

पुढे वाचा ..

कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही संजू बनू शकत नाही; अर्षद वारसीचा रणबीरला टोमणा 

कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही संजू बनू शकत नाही; अर्षद वारसीचा रणबीरला टोमणा 

‘संजू’ चित्रपटातील संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने खूप मेहनत घेतली असली तरी संजयचे मित्र अर्षद आणि सलमान यांना खुश करण्यात तो अपयशी ठरला. ‘संजू’ हा यावर्षीचा बहुचर्चित असलेला चित्रपट आहे. रणबीर या भूमिकेला न्याय देऊ शकेल की नाही ही शंका सुरवातीपासूनच अनेकांच्या मनामध्ये होती. परंतु सलमान आणि अर्षदच्या मते तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही ‘संजू’ बनू शकत नाही. एका कार्यक्रमात अर्षदला रणबीरच्या संजुमधील भूमिकेबद्दल विचारल्यावर त्याने रणबीरच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटाची प्रशंसा केली. रणबीरने संजय…

पुढे वाचा ..

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ ने चीन मध्ये पहिल्याच दिवशी १५.९४ कोटी कमवले

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ ने चीन मध्ये पहिल्याच दिवशी १५.९४ कोटी कमवले

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा टॉयलेट एक प्रेम कथा हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झालेल्या इतर बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत अपयशी ठरला. या चित्रपटाने भारतामध्ये या चित्रपटाने एकूण १३४.२२ कोटींची कमी केली आहे. हिंदी मिडीयम, सिक्रेट सुपरस्टार आणि बजरंगी भाईजान नंतर चीनमधील हिंदी सिनेमाच्या चाहत्यांना अक्षय कुमारचा टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट पाहायला मिळाला. चित्रपटातील सोशल ड्रामा हा चायनीज प्रेक्षकांना भावला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने १५.९४ कोटी रुपये कमवले. हा चित्रपट 11500 ठिकाणी…

पुढे वाचा ..

मुंबईत मान्सूनचे आगमन, अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत मान्सूनचे आगमन, अतिवृष्टीचा इशारा

यावर्षीच्या मान्सूनचे मुंबईमध्ये जोरदार आगमन झाले असून राज्यात  इतर ठिकाणीदेखील पावसाने हजेरी लावली आहे.  हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मासे व्यवसाय करणाऱ्या लोकांना कोकण आणि गोवा किनाऱ्यावर १२ जूनपर्यंत जाण्यास मनाई केली आहे. कुलाबा वेधशाळेमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत ०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी मान्सून शहारामध्ये दाखल होईल आणि ठिकठिकाणी पावसाला सुरवात होइल अशी शक्यता हवामान खात्याचे शास्त्रज्ञ अजय कुमार यांनी वर्तवली होती.

पुढे वाचा ..

गेल्या चार वर्षात भारताने वर्ल्ड बँकेकडून किती लोन घेतले ?

गेल्या चार वर्षात भारताने वर्ल्ड बँकेकडून किती लोन घेतले ?

सोशल मिडीयावर सध्या एक मेसेज खूप व्हायरल होतोय ज्यात म्हटलं जातंय कि मोदींच्या कारकिर्दीत म्हणजे गेल्या चार वर्षात भारताने वर्ल्ड बँक कडून एकही रुपया कर्ज घेतलेलं नाही. हि पोस्ट खरी आहे कि खोटी हे बघण्यासाठी आम्ही थेट वर्ल्ड बँकेच्या वेबसाईट वर जाऊन चेक करायचं ठरवलं .. मोदी १६ मे २०१४ रोजी देशाचे पंतप्रधान झाले, म्हणून जून २०१४ ते जून २०१८ या कालखंडात वर्ल्ड बँकेने दिलेले कर्ज आम्ही कॅल्क्युलेट करायचे ठरवले. वर्ल्ड बँकेच्या http://projects.worldbank.org/ या साईटवर जाऊन…

पुढे वाचा ..

एसटी कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांचे हाल

वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील अनेक एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. राज्यात ठिकठिकाणी परिवहन सेवा अचानकपणे ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या संपामुळे एकूण २५० डेपोंपैकी ५० डेपोंमधील काम बंद पडले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. ऑक्टोबरमधील संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचार्यांचे वेतन कमी केले आहे आणि संघटनेतर्फे अशाप्रकरच्या संपाची कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक सेवा विस्कळीत…

पुढे वाचा ..

रेल्वेमध्ये अतिरिक्त सामानाकरीता आता दंड!

रेल्वेमध्ये अतिरिक्त सामानाकरीता आता दंड!

रेल्वे प्रवाशांनी मर्यादेपेक्षा अतिरिक्त सामान बाळगल्यास यापुढे दंड आकारण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते राजेश वाजपेयी यांच्या मते अतिरिक्त सामान बाळगल्याने इतर प्रवाशांची गैरसोय होते,याबद्दल प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.रेल्वेचे सामान वाहून नेण्यासंबंधितचे नियम आणि तरतुदी यांची माहिती प्रवाशांना मिळावी हा उद्देश यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु रेल्वे तोट्यात असल्याकारणाने  प्रवाशांकडून  कर जमा केला जात आहे, असे मत नागरिकांनी समाजमाध्यमांवर नोंदवल्याचे  दिसते. विहित मानदंडानुसार स्लीपर क्लास प्रवासी ४० किलो सामान आणि…

पुढे वाचा ..

सोशल मिडीयावर प्रणव मुखर्जी यांचा फोटो व्हायरल, हि भाजप आणि संघाची खेळी असल्याचा शर्मिष्ठा यांचा आरोप

सोशल मिडीयावर प्रणव मुखर्जी यांचा फोटो व्हायरल, हि भाजप आणि संघाची खेळी असल्याचा शर्मिष्ठा यांचा आरोप

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा छेडछाड केलेला फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असून हे निंदनीय कृत्य भाजप आणि संघाचे असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केला आहे. या फोटोमध्ये प्रणव मुखर्जी हे संघाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे अभिवादन करत आहेत. तर मूळ चित्रामध्ये ते अभिवादन न करता उभे आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयास भेट देण्यास शर्मिष्ठा यांचा विरोध असल्याचे त्यांनी ट्वीटरवर व्यक्त केले होते. ‘भाजपच्या या खेळीची कल्पना आली असेल हि…

पुढे वाचा ..

दहावीचा निकाल जाहीर

दहावीचा निकाल जाहीर

राज्याचा निकाल ८१.४१ टक्के , कोकण विभाग अव्वल   मार्च २०१८ मध्ये झालेल्या या परीक्षेमध्ये एकूण १४,५६,२०३ विध्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये कोकण विभागाचा सर्वात जास्त म्हणजे ९६% निकाल लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी ८५.९७% निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली. यामध्ये ९२.३६% मुली तर ८५.२३% मुले उत्तीर्ण झाले आहेत.६,३३,०९० विद्यार्थिनीपैकी ५,८४,६९२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ७,८३,८९६ विद्यार्थिनीपैकी ६,६८,१२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय निकाल कोकण ९६% कोल्हापूर ९१% पुणे…

पुढे वाचा ..
1 25 26 27 28 29 40