गोष्ट एका छोट्याश्या कंडोमची

चारचौघात कुणी मोठ्याने कंडोम जरी म्हणालं तरी बावचळून इकडून तिकडे पाहणारा आपला समाज, कंडोम घ्यायला मेडिकल शॉप वर गेला तरी थोडा वेळ घुटमळत बाकीचे गिर्हाईक जाऊ देण्याची वाट पाहतो. विधिवत लग्न झालेले बाप्ये जिथं कंडोम खाकी पाकिटातून घरी नेतात तिथं अविवाहित लोकांनी तर कंडोम मागणे काय कंडोम हा शब्द उच्चारणे देखील महापाप..

 

असे असले तरी या कंडोम ने आजवर लाखो नाही करोडो जनांचे प्राण वाचवलेत, इतिहासात कंडोमचा सर्व व्यापी वापर सुरु होण्याआधी बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा सैनिक सिफिलीस या लैंगिक रोगाने मृत्युमुखी पडत असत. कंडोमचा शोध लागल्यावर हे प्रमाण आरेच कमी झाले तर आता कंडोमच्या शोधाची एक मनोरंजक गोष्ट आपण बघू..

 

रोमन देवता मोनोस हा त्याचं वीर्य समोरच्या स्त्रीच्या शरीरात जाऊ नये म्हणून बकरीच्या आतड्यापासून बनवलेलं कंडोम वापरात असल्याची आख्यायिका असली तरी त्याचे पुरावे सापडत नाहीत, चीनी लोक मात्र भलतेच हुशार होते, त्यांनी ओईल लावलेला कागद व सिल्क यांच्यापासून कंडोम बनवून वापरायला सुरुवात केली होती. युरोपात लिनेन, बकरीचं आतडं, पित्ताशय यांच्यापासून कंडोम बनवण्याची पद्धत सुरु झाली, त्यानंतर थेट सोळाव्या शतकात सैनिकांना सिफिलीस नावाच्या लैंगिक रोगापासून वाचवण्यासाठी वेगवेगळ्या औषधी द्रव्यात बुडवलेल्या सिल्कच्या कापडाचा वापर केला गेला, त्या कपड्याला योग्य जागेवर ठेवण्यासाठी चक्क रिबिनीचा वापर केला जात होता.

1666 साली ब्रिटीशांनी ब्रिटिश नागरिकांत जन्म दर का कमी होतोय याचा अभ्यास करण्यासाठी एक आयोग नेमला त्यांनी काँदोन (condon) या शब्दाचा सर्वात पहिला उपयोग केला. इथूनच पुढे कंडोम हा शब्द जन्माला आला असावा. इथून पुढे 19व्या शतकात कंडोमच्या विरोधात चर्च, न्यायालय व समाजातील प्रतिगामी लोकांनी कंडोम वापर अनैतिक ठरवून त्यचा विरोध करायला सुरू केला. तोपर्यंत थॉमस गुडइयर नावाच्या माणसाने (गुडइयर टायरवाले ते हेच) रबराच्या व्हल्कनायझेशन चा शोध लावला या प्रक्रियेने रबर हवं त्या प्रकारे मोल्ड करता येऊ लागलं. मग बकऱ्यांची आतडी व पित्ताशय वापरण्याच्या पद्धतीपासून माणसांची (व बकऱ्यांचीही) सुटका झाली मात्र पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात “लढायला” गेलेल्या ब्रिटिश व अमेरिकन सैनिकांनी सिफिलीस या आजाराची भेट मायदेशी आणली. शीतयुद्ध सुरू असताना अमेरिकेत लैंगिक रोगांच्या रुग्णाची संख्या ही आभाळाला भिडली होती. या संकटावर मात करण्यासाठी अमेरिकन सरकारने मोठ्या प्रमाणावर abstinence अर्थात ब्रह्मचार्याची मोहीम राबवली, तिचा फज्जा उडाला मग त्यानंतर अमेरिकेच्या सरकारला लॅटेक्स पासून बनवलेल्या कंडोमचा आधारच घ्यावा लागला.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment