७५० किलो कांदा विकून मिळाले १०६४ रुपये; उद्विग्न शेतकर्याने पैसे पंतप्रधान मोदींना पाठवले

नाशिक : लासलगाव कृषी उतपन्न बाजार समिती आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे.  शेकडो टन कांद्याची दिवसाची आवक असलेली बाजारपेठ आशियातील सर्वात मोठी बाजार पेठ आहे. नाशिक जिल्हा कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे परंतु पडत्या दरांमुळे शेतकर्यांना त्याचा खर्च काढणे हि अवघड झाल्याचे चित्र समोर येत आहे.

निफाड तालुक्यातील शेतकरी संजय साठे यांनी त्यांचा कांदा याच बाजारपेठेत विक्रीकरिता आणला होता. त्यांच्या शेतात ७५० किलो कांद्याचं उत्पादन झालं होतं. निफाडमधील बाजार समितीत त्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. पण एका किलोला १रुपये ४० पैसे इतका कमी दर मिळाला. ७५० किलो    कांदा विकून त्यांना १०६४ रुपये मिळाले.

यावर आपली उद्विघ्न प्रतिक्रिया देताना साठे म्हणाले

“कांद्याचं पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना चार महिने शेतात राबावं लागतं. कांदा ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी दोन मजूर लागले होते. त्यांची मजुरीच 400 रुपये झाली. तर ट्रॅक्टरचे भाडे 700 रुपये झाले होते. हा कांदा घेऊन जेव्हा मी लासलगावच्या बाजार समितीतील उपबाजार समिती आलो, तेव्हा कांद्याचे लिलाव सुरू होते. लिलावात कांद्यांना क्विंटलला 200 ते 300 रुपये दर मिळत होता. कांद्याला किलोसाठी दीड रुपयेही इतका दरही मिळाला नाही. हिशोबपट्टी हाती घेतली तेव्हा मला धक्काच बसला”

“हे पैसे घेऊन मी तडक पोस्टात गेलो आणि हे पैसै थेट पंतप्रधान कार्यालयात पाठून दिले. हे पैसे मनीऑर्डरने पाठवण्यासाठी मला 54 रुपये खर्च आला,”

पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी शेतकर्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे यासठी आपण हे कृत्य केल्याचे साठे यांनी सांगितले. साठे हे नैताळे गावचे रहिवासी असून २०१० ला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा करण्यासाठी निवडल्या गेलेल्या शेतकर्यांमध्ये त्यांचा समावेश होता. साठे यांनी या सर्व गोष्टीसाठी नोटबंदीला जबाबदार धरले आहे. ते सांगतात,

“पूर्वीही दर पडत होते. पण आताची स्थिती फारच वाईट आहे. खतं, कीटकनाशकं, बियाणे यांचे दर गगनाला भिडले आहेत. तर एकाही पिकातून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत नाही. नगदी पिकातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा असते, पण तीही फोल ठरली आहे.”

नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं ते सांगतात.

साठे यांनी त्यांच्या टॅॅक्टर वर नरेंद्र मोदि यांच्या निषेधाचे फलकही लावले होते.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment