गडकरींचा आशीर्वाद माझ्या सोबत : कॉंग्रेस नेते आशिष देशमुख.

कॉंग्रेसचे आशिष देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आशिष देशमुख हे दीड वर्षा पूर्वी भाजप मध्येच होते. मात्र आत्ता ते काँग्रेस च्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
आशिष म्हणाले मुख्यमंत्री विदर्भद्रोही आहेत,वेगळा विदर्भ होण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. या मुळे विदर्भ आणि नागपूरची जनता फडणवीस यांच्यावर नाराज आहे. याच कारणांमुळे दक्षिण पश्चिम मतदारसंघात परिवर्तन होईल आणि फडणवीस पडतील. नितीन गडकरी मला पितृतुल्य आहेत, आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या सोबत असतो. तो आत्ताही आहे असं वक्तव्य देशमुख यांनी केलं.

 

 

नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा इतिहास असा आहे की ,२००४ साली आशिष देशमुख यांचे वडील तत्कालीन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. प्रदेशाध्यक्ष असूनही रणजितसिंह देशमुख यांचा पराभव तेव्हा झाला होता.आत्ता त्याच मतदारसंघातून आशिष देशमुख फडणवीस यांना आवाहन देत आहेत.

.

Leave a Comment