नेहरू आणि अटल, नातं राजकारणा पलीकडचं.

 

नेहरू आणि अटल बिहारी हे त्यांच्या काळातले मोठे नेते होते. दोघांचाही लोकशाही मुल्यांवर प्रचंड विश्वास होता. दोघेही  त्यांच्या काळातील सुसंकृत राज्यकर्ते म्हणून ओळखले गेले. अटल बिहारी पहिल्यांदा १९५७ साली खासदार झाले तेव्हा पासून नेहरूंचे या युवा खासदारावर लक्ष होते. दिल्लीच्या राजकीय गोटात तेव्हा नेहमी अशी चर्चा असायची की नेहरू अटल बिहारी यांचे भाषण ऐकण्यासाठी आवर्जून सभागृहात येतात.

अटलजींचे अंतरर्ष्ट्रीय बाबींच ज्ञान वादादित होते त्यामुळे, बाहेर देशातील कोणी पाहुणे आले तर नेहरू अटलजींची ओळख त्यांना करून देत. असंच एकदा नेहरू अटल यांची ओळख करून देताना म्हणाले की हे अटल बिहारी विरोधी पक्षाचे आहेत.माझा व माझ्या पार्टीचा प्रचंड विरोध करतात पण तरीही मला यांच्यासारख्या  युवकांमुळे भारताचे भविष्य उज्वल दिसते.

 

१९६२ साली अटल बिहारी बलरामपुर मधून निवडणूक लढत होते. नेहरूंची एक सभा तेव्हा लाखोंची होत असत. असं  असून पण  नेहरूंनी बलरामपुरमध्ये एकही सभा घेतली नाही. पक्षाकडून नेहरूंना जेव्हा विचारण्यात आले तेव्हा नेहरू इतकच म्हाणाले की मी हे नाही करू शकत  माझ्यावर कृपया  दबाव टाकू नका

“ त्या पोराचे स्थानिक, राजकीय आणि अंतरर्ष्ट्रीय ज्ञान चांगले आहे” जे देशाला उपयोगी पडेल.

वाजपायी मात्र त्यांची विरोधी पक्षातली भूमिका आपसूक वठवत होते सभागृहात ते नेहरू सरकार वर तुटून पडायचे. आपल्या शैलीत अटल बिहारी नेहरूंचा  नियमितपणे समाचार घ्यायचे.वाजपायी यांनी नेहरूंवर काश्मीरच्या मुद्द्यावरून अनेक आरोप केले. नेहरू मात्र ते प्रचंड खिळाडू  वृतीने घेत.

१६६२ साली जेव्हा चीनने आपल्यावर हल्ला केला तेव्हा भारत पराभवाच्या छायेत होता. वाजपायी नेहरूंना जाऊन भेटले आणि पार्लमेंटचे एक सत्र बोलवण्याची विनंती त्यांनी नेहरुंना केली. नेहरूंनी होकार दिला आणि सत्र सुरु झाले. सर्व स्थरातून नेहरूंवर टीका होत होती सभागृहात पण तेच चित्र होतं.

वाजपायी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. वाजपायी उठले आणि म्हणाले चीन पासून असणार्या  धोक्याकडे काना डोळा करून “नेहरूंनी मोठा गुन्हा केला आहे” आणि त्यानंतर त्यांनी जोरदार भाषण केले व नेहरूंवर भरपूर टीका केली. चीनचे युद्ध हे नेहरूंसाठी एक मोठा आघात ठरले. त्यांची अंतराष्ट्रीय प्रतिमा त्यामुळे काहीशी खालावली. त्यानंतर नेहरूंची प्रकृती ही खालावत गेली नेहरूंची उर्जा आणि सरकारी कामातला त्यांचा सहभाग पुढे कमी कमी होत गेला.मे १९६४ ला नेहरू वारले, वाजपायी यांना नेहरूंच्या जाण्याने यातना  झाल्या.

एका भाषणात ते म्हाणाले ” भारत मातेने तिचा लाडका राजकुमार आज गमावला आहे. एक स्वप्न तुटले आहे, एक तेजोमय दिवा, अनंतकाळासाठी विझला आहे,ज्या दिव्याने अनेक संघर्षातून या देशाला वाट दाखवली तो दिवा आज विझला आहे. तो रात्रभर जाळला अंधाराशी भांडला आणि सकाळचा उजेड येताच तो दिवा अनंताला प्राप्त झाला.सामान्य माणसाचे छत्र आज हरवले आहे. कॉमन मॅनच्या डोळ्यातील आशेचा किरण आज लोप पावलेला आहे” 

विरोधी पक्षाच्या खासदाराकडून कोणालाच इतक्या भावनिक भाषणाची अपेक्षा नव्हती. कॉंग्रेसच्या समांतर विरोधी विचारसरणीच्या अटलजींचे हे भावनिक भाषण ऐकून अनेकंचे डोळे विस्फारेल. अटलजींना मात्र बरोबर माहित होते की कुठे राजकारण करायचे आणि कुठे नाही.

नेहरू गेल्यानंतरचा एक किस्सा आहे जो आजच्या राजकारण्यांसाठी उद्बोधक आहे. आणीबाणीनंतर १९७७ साली इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. निवडणूक झाली आणि इंदिरा गांधी स्वतः निवडणूक हरल्या कॉंग्रेस सपाटून पडली. केंद्रात जनता पार्टीचे सरकार आले मोरारजी देसाई पतंप्रधान झाले. वाजपायी यांना विदेश मंत्रालय देण्यात आले. वाजपेयी आपला चार्ज घ्यायला जाण्याआधी अधिकार्यांनी नेहरू आणि कॉंग्रेसशी  निगडित सर्व गोष्टी सरकारी कार्यालयातून काढण्यास सुरवात केली होती. त्यामुळे त्यांनी विदेश मंत्रालयातला नेहरूंचा फोटो ही काढला  होता. अटल बिहारी मंत्री होण्याआधी  अनेकदा विदेश मंत्रालयाच्या इमारतीत गेले होते.

जेव्हा मंत्रालयाचा चार्ज घेयायला अटल बिहारी मंत्रालयाच्या इमारतीत पोहचले तेव्हा त्यांना नेहरूंचा फोटो दिसला नाही. अटलजींनी स्वतःच्या सेक्रेटरीला बोलावले आणि चढलेल्या संतापजनक आवाजात म्हणाले इथे पंडीतजींचा एक फोटो या भिंतीवर होता तो कुठे आहे? मला तो फोटो त्याच भिंतीवर अगदी त्याच जागी हवा आहे”अधिकार्यांनी नंतर नेहरूंचा तो फोटो शोधून अगदी त्याच ठिकाणी लावला.

राजकारणातला एक तो काळ होता अतिशय विरोधी विचारसारणीचे असून सुद्धा नेते मनात कोणतीच वितुष्टा ठेवत नव्हते. सुसंस्कृत राजकारणाचा तो एक सुवर्णकाळ होता असेच आज म्हणावे लागेल.

.

Leave a Comment