‘आधी गुजरात, मग देश’ नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम

नवी दिल्ली : काल देशात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत या पावसात गारपीटही झाली. या पावसाने देशभरात तब्बल ३५ ते ४० जणांचे प्राण घेतले. तर अनेक राज्यांत शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे मध्य प्रदेशात तब्बल १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर गुजरात आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे ११ आणि ७ जणांचा बळी या पावसाने घेतला. तर महाराष्ट्रातही वीज पडून एका शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसंच पंजाबमध्ये २, तर हरियाणा, झारखंड, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथे प्रत्येकी एक जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात झालेल्या या वादळामुळे देशात अनेक ठीकाणी मोठे नुकसान झाले. जीवीत हानी झाली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही बोलताना पंतप्रधान या नात्याने संपूर्ण देशात झालेल्या नुकसानीवर बोलने अपेक्षित होते. मात्र त्यांनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये गुजरातमधील नुकसानीबाबत दुःख व्यक्त केले. गुजरातमध्ये आलेल्या वादळी-वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचं मला दु:ख आहे. मी प्रार्थना करतो की, जखमी लवकरात लवकर बरे होतील, असं त्यांनी म्हटलं. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदतही मोदींनी जाहीर केली. तेव्हा त्यांना इतर राज्यांचा विसर पडला असवा. मात्र काही काळानंतर त्यांनी इतर राज्यांनाही मदत करत तेथे झालेल्या नुकसानीवर ट्वीट करत दुःख व्यक्त केले.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेकांना वादळी-वाऱ्याचा आणि गारपिटीचा फटका बसला आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आपन उत्पादन घेतलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहेच. आता त्यांच्यावर निर्सगाचेही संकट कोसळले आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेतून अद्याप बाहेर आलेले नाहीत. त्यांच्या या भूमिकेवरून हेच समजते की ते आधी एका पक्षाचे नेते आहेत, नंतर पंतप्रधान आहेत”- डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस प्रवक्त्या)

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment