मोदींची मुलाखत पूर्वनियोजित ?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींची बहुचर्चित व बहुप्रतिक्षित मुलाखत अखेर निराशाजनक ठरली कारण मोदी सरकारच्या कामगिरीवर एकही थेट प्रश्न या मुलाखतीत विचारण्यात आला नाही.

ANI या वृत्तसंस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुलाखत दिली. तब्बल 90 मिनिटांच्या या मुलाखतीत मोदींना अनेक प्रश्न विचारण्यात आले व त्यांनीही मोकळेपणाने त्यांची उत्तरे दिली. मात्र रोजगार, धार्मिक तणाव व राफेल घोटाळ्यावर संयुक्त संसदीय समिती या बद्दल त्यांना प्रश्नच विचारण्यात आले नाहीत.

सामान्यपणे राजकीय नेत्यांच्या मुलाखतीत त्यांनी दिलेल्या उत्तरांना फॉलोअप प्रश्न विचारले जातात. प्रश्न, त्यांची उत्तरे आणि त्यांना प्रतीप्रश्न याप्रकारे मुलाखत पुढे जाते, मुलाखतकर्त्याने नेत्यांना त्यांच्या उत्तरातली विसंगती दाखवून स्पष्टीकरण मागायचे असते. मात्र मुलाखत घेणाऱ्या ANI च्या संपादक स्मिता प्रकाश यांनी बऱ्याच विषयात पाठपुरावा करणारे प्रश्न विचारलेच नाहीत.

देशभरात आज नोकऱ्यांची स्थिती गंभीर आहे, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने वर्षाला तीन लाख नवीन रोजगार ही दिलेले नाहीत, सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा असलेल्या या प्रश्नाला मुलाखतीत जागा नव्हती. या आधीच्या एका मुलाखतीत मोदींनी रस्त्यावर कुणी पकोडे विकत असेल तर तो रोजगार नाही का अशी विचारणा केली होती.

साबरीमला, राम मंदिर व ट्रिपल तलाक या प्रश्नावर मोदींनी उत्तरे दिली खरी मात्र त्यांना फॉलोअप प्रश्नच विचारण्यात आलेले नाहीत, राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार का हा प्रश्न विचारल्यावर ते आम्ही कोर्टाचा आदेश आल्यावर ठरवू असे ते म्हणाले, मात्र ट्रिपल तलाक च्या प्रश्नात आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत आहोत असे ते म्हणाले. साबरीमला हा आमच्या आस्थेचा विषय असल्याचे ते म्हणाले मात्र ट्रिपल तलाक हा सुद्धा आस्थेचाच विषय आहे हे ते विसरले.

राफेल घोटाळ्याच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला क्लिनचिट मिळाल्याचे त्यांनी सांगितले मात्र जर घोटाळा झालाच नसेल तर संयुक्त संसदीय समिती स्थापन करायला भाजपचा विरोध का आहे असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला नाही.

 

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

COMMENTS

  • Dattu Gavankar

    मुलाखत पूर्व नियोजित असेल तर फॉलोअप प्रश्न कसे विचारणार?
    मोदींची फसवेगिरी सुरूच आहे…
    मुलाखत फिक्स केलेली वाटली…

Leave a Comment