मोदींच्या आदेशावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी केली- जयंत पाटील यांचा आरोप

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ संकल्प मेळाव्यासाठी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली येथे आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी केली असा आरोप केला आहे. 182 मीटरचा सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम आघाडी सरकारच्या काळात 2012 ला सुरू झाले होते. त्यावेळी जगातील सर्वात उंच 204 मीटरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेलं  स्मारक अरबी समुद्रात बनविण्याचा निर्णय कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने राज्यात घेतला त्या समितीचे अध्यक्ष पद माझ्याकडे होते. असेही श्री जयंत पाटील म्हणाले.

आधीच मराठा आरक्षणामुळे अडचणीत आलेले फडणवीस सरकार या आरोपांना कसे सामोरे जाते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment