मोदींचा तुघलकी फतवा आणि अर्धा कोटी जनता बेरोजगार!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाचवर्षात अनेक मोठमोठे निर्णय घेतले. त्यामुळे झालेल्या त्रासाला सामान्य जनतेला समोर जावे लागले. त्यात मोदींनी २०१४ मध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर दर वर्षी २ कोटी रोजगार उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. मात्र मोदींच्या एका निर्णयाने क्षणार्धात ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्याचे समोर आले आहे. बंगळुरुमधील अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंटनं (सीएसई) काल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात यासंदर्भात लिहीण्यात आले आहे.
बंगळुरुतल्या अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंटनं ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया २०१९’ अहवाल प्रसिद्ध केला. या अहवाला नुसार २०१६ ते २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल ५० लाख पुरुषांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यावर एसईचे अध्यक्ष आणि हा अहवाल बनवण्याच्या अग्रभागी असणारे अमित बसोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. मोदींनी नोटबंदी केल्यानंतर ५० लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही. आकडेवारीनुसार नोटबंदीच्या काळात (सप्टेंबर ते डिसेंबर 2016) रोजगाराचं प्रमाण कमी झालं. चार महिन्यांच्या कालावधीत नोकऱ्या घटल्या, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ वा रात्री नोटबंदीचा निर्णय जाहिर केला. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अहवालात नोकऱ्या आणि नोटबंदीचा निर्णय याचा थेट संबंध नाही परंतू याच काळात ५० लाख रोजगार गेल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये अधिकतर कमी शिक्षण झालेल्यांचे प्रमाण आहे. अहवालानुसार २०११ नंतर बेरोजगारीचा टक्का वाढला आहे. तर २०००-२००११ या वर्षांतील आकडेवारी आणि २०१८ मधील आकडेवारी यांची तुलना केल्यास बेरोजराचे प्रमाण आता दुप्पट आहे, हेही अहवालात स्पष्ट कले आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment