संघाच्या आजन्म प्रचारकानेच केले भाजपच्या कार्यकर्तीचे लैंगिक शोषण.

भाजपच्या पक्ष कार्यालयातच #metoo

देहरादून (उत्तराखंड) – भारतीय जनता पक्ष – उत्तराखंड राज्याचे महासचिव श्री. संजय कुमार यांच्यावर पक्षातील महिला पदाधिकार्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. संजय कुमार यांनी पक्ष कार्यालयातच माझे लैंगिक शोषण केले असल्याचा खळबळजनक आरोप या महिलेने केला आहे. विशेष म्हणजे देशभरात नोकर्यांची स्थिती चिंताजनक असताना भाजपा पदाधिकार्याने हे लैंगिक शोषण नोकरीचे आमिष दाखवून केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

“मी लहानपणीपासून संघाच्या शाखांना माझ्या भावांसोबत हजेरी लावायची, संघ माझ्या कुटुंबाचा एक भाग होता, मात्र संघाच्या प्रचारकाला असा दुर्व्यवहार शोभत नाही” अशी प्रतिक्रिया पिडीत महिलेने आज एका वृत्तपत्राला दिली.

म्हणाले “मी प्रचारक आहे हे विसरून जा, हि माझी शारीरिक गरज आहे”

पिडीत महिलेने आपल्या मोबाईल मध्ये या लैंगिक छळाचे स्क्रीनशॉट पुरावे म्हणून असल्याने आपला हा मोबाईल हिसकावून घेतला असल्याचीही तक्रार केली आहे. “मी पोलिसांकडे तक्रार करायला गेले असता तिथून मला हाकलून लावण्यात आले, मग मी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकार्यांना भेटले, त्यांनीही माझं ऐकलं नाही तेव्हा मी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून याबद्दल माहिती दिली” असे त्या महिलेचे म्हणणे आहे.

दरम्यान, एक सांस्कृतिक संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजन्म स्वयंसेवक असलेल्या व संघटन महासचीव या वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या संजय कुमार यांच्या कडून असा प्रकार घडल्याने संघालाही तोंड दाखवणे अवघडच झाले आहे.
“संजय कुमार संघाचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या हकालपट्टीबद्दल अधिकृत भाष्य संघच करेल” असे म्हणत प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment