ममता विरुद्ध CBI प्रकरणात नवा अध्याय…

कोलकत्ता येथे रंगलेला सीबीआय विरुद्ध कोलकत्ता पोलीस हा वाद जरी मिटला आहे असे दिसत असले तरी या प्रकरणाच्या चौकशीतून एक नवीन मुद्दा सामोर आलेला आहे.
सीबीआय चे माजी प्रमुख एम. नागेश्वर राव यांच्याशी संबंधित असलेल्या Angela Mercantiles Private Ltd(AMPL) या कंपनीवर मागील दोन महिन्यापूर्वी कोलकत्ता पोलिसांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या आदेशावरून छापा घातला होता. या छाप्यात नागेश्वर राव यांच्या पत्नी व मुलीच्या खात्यावरून पैशाची देवाण-घेवाण झाल्याचे सामोर आले होते.
नागेश्वर राव यांच्या पत्नी एम.संध्या व AMPLमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे या तपासणीत उघडकीस आले होते. एम.संध्या यांनी AMPL कडून २०११ मध्ये २५ लाख रुपये घेतले होते तर, २०१२-१४ या आर्थिक वर्षात एम.संध्या यांनी AMPL ला १.१४ कोटी चे कर्ज दिल्याचे उघडकीस आले आहे.

राजीव कुमार यांच्यावर झालेली विनावारंट कारवाई याचं मुळे तर नाही ना झाली असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाबद्दल रत्नाकर महाजन यांना विचारले असता,’त्यांनी कोलकत्ता येथे झालेले प्रकरण हे मोदी व शहा यांनी खूप मोठे आखले असणार, नागेश्वर रावांच्या संबंधित मुद्दा हा या प्रकरणाचा एक आरा होऊ शकतो, परंतु, मोदी व शहा यांना त्यांच्या पक्षाच्या अधिपत्याखाली नसणारी राज्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी ताब्यात घ्यायची आहेत व त्यासाठी त्यांनी हा खाटाटोप लावला आहे.राज्यांच्या अधिकार क्षेत्रात हा एकप्रकारे हस्तक्षेप आहे. परंतु, ममता बॅनर्जी च्या लढाऊ वृत्तीमुळे त्यांना हे प्रकरण मोठे करता आले नाही.
बाकी, नागेश्वर राव यांनी कार्यभाराच्या शेवटी उचललेले पाऊल हे त्यांना नक्कीच महागात पडेल,’ असे मत रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केले.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment