पाकिस्तानी मूळचे अर्थमंत्री बनवत आहेत ‘महात्मा गांधीच्या’ स्मरणार्थ नाणं

युनायटेड किंग्डमच्या सरकारने महात्मा गांधींच्या  १५० व्या जयंती निमित्त संस्मरणीय नाणे बनवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी लंडनमध्ये वार्षिक जीजी पुरस्कार समारंभ पार पडला.

या समारंभात पाकिस्तानी मूळचे ब्रिटिश अर्थमंत्री साजिद जावीद यांनी महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ त्यांच्या १५०व्या जयंती एक नाणे बनवणार असल्याची घोषणा केली.

त्यांनी ब्रिटनच्या रॉयल मिंटला हे नाणे तयार करण्याचे आदेश दिले आहेत . ब्रिटन मधील पॉवरफुल आशियन लोकांची यादी बनवली जाते जिला  जीजी २ म्हंटले जाते या यादीत साजिद जावीद यांनी अव्वल स्थान पटकविले आहे.
साजिद जावीद यांनी जीजी २ च्या समारंभात हे नाणे बनवण्यामागील मूळ हेतू स्पष्ट केला. ” आजचा पुरस्कार सोहळयात आपण महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरा करतो आहोत. महात्मा गांधीजींनी या जगाला जी शिकवण दिली ती आपण विसरून चालणार नाही.

गांधींजीनी आपल्याला शिकवले की , सत्ता ही फक्त संपत्ती आणि उच्च शिक्षणाने कमावली जात नाही. आपण गांधींनी शिकवलेली जगण्याची मूल्ये नेहमी लक्षात ठेवायला हवीत. त्यासाठी आपणं गांधीजींच्या विचारांना, त्यांच्या मूल्यांना लोकांच्या स्मरणात टिकवून ठेवण्यासाठी या नाण्याची निर्मिती करत आहोत.” असं ते म्हणाले.

.

Leave a Comment