सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जनावरांचा मोर्चा’

सांगली : राज्यात दुष्काळजन्य परिस्थीती आहे. लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. त्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकरीही हतबल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना भेटी देत तेथील परिस्थीती जाणून घेतली. त्यानंतर फडणवीस सरकराला दुष्काळावर काही उपाय योजना करण्याचे सल्ले त्यांनी दिले.

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे गावकरी सरकारवर नाराज आहेत. तसंच या गावकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज राष्ट्रवादीने ‘जनावरांचा मोर्चा’ काढला. हा मोर्चा दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांविषयी काढण्यात आला. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या वेळी जयवंत पाटलांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. कर्नाटकात दावणीला चारा दिला जातोय मात्र महाराष्ट्रात ना चारा ना चारा छावण्या अशी स्थिती आहे. भाजपा सरकार हे दुष्काळाकडेसुद्धा पक्षीय दृष्टिकोनातून बघतय. भाजपाला पाठींबा दिलेल्या लोकांनाच फक्त चारा पाणी दिला जातोय हे चुकीचे आहे, अशी गंभीर टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

तर सध्या लोकसभेच्या एक्झिट पोल म्हणजे निवडणूक निकालावरूनही जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावरही जयंत पाटलांनी आपले मनोगत व्यक्त केले. एक्झिट पोल म्हणजे निवडणूक निकालावर नव्हे, आम्ही ग्राऊंडवर गेलो होतो. जनतेच्या मनात काय आहे. हे आम्ही अनुभवलं आहे. महाराष्ट्रात २३ पेक्षा आमच्या जगा कमी येणार नाहीत. पण तसं झालं तर ‘दाल मे कूछ काला है’ अस लोक म्हणतील. प्रत्येक मशीन मधून व्ही व्ही पॅडच्या स्लिप मोजाव्यात, असंही जयंत पाटील यांनी सांगितले. तसंच मोदी लाट ओसरली आहे. त्यांच्या सभा ओस पडत होत्या. जनतेत भाजपा विरोधी रोष होता. तरी एक्झिट पोल प्रमाणे आकडे येणार असतील तर हे मॅनेज आहे, असं लोकांना नक्की वाटेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

.

Leave a Comment