लोकसभा २०१९ कोण जिंकणार?, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारतात आहे. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतावर लागले आहे. जगाचे लक्ष असणे सहाजीक आहेच, त्यात भारताचा पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता भारतीयांना आहे तेवढीच पाकिस्तानच्या लोकांनाही आहे. दोन्ही देशातील वातावरण सध्या अधिक तणावाचे आहे.

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने भारतीतीय पुलवामा येथे हल्ला केला. त्यात भारतीय सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. त्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक केला. ही दहशतवादी तळे उध्वस्त केली. त्यानंतर देन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या विरोधात अधिक कठोर कारवाई केली. त्यामुळे त्यांच्या पाकिस्तान त्यांच्या विरोधात असेल असे वाटले होते. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधांन इम्रान खान यांनी मोदीच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत असं सांगितलं. त्यावरून भारतासह पाकिस्तानमध्येही चर्चा झाल्या. त्यात भारताच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानमध्येही केले जाणार आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मोदीच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत असं वाटत असले तरी पाकिस्तानमधील जनतेला मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान होऊ नयेत असंच वाटतं आहे. लाहोर मधील एका व्यक्तीने मोदींबद्दल सांगताना म्हटलं की, मोदी पुन्हा सत्तेत येऊ नयेत, त्यांनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. तर अशीच काहीशी प्रतिक्रिया पाकिस्तानी लोकांनी दिली. तर पाकिस्तानबाहेर राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांनीही यावर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या म्हणण्यानुसार मोदींना पुन्हा सत्ता मिळाली पाहिजे. यामुळे पाकिस्तानच्या भूमीवरून सुरु असलेल्या दहशतवादी संघटनांना जबर बसेल. पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे, असं बाहेरील पाकिस्तानी नागरिकांचे मत आहे.

दरम्यान, देशात जानेवारीत काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका पार पडल्या. त्यात भाजपचा दारून पराभव झाला. त्यानंतर मोदी सरकार लोकांची विश्वासर्हता गमावत असल्याचे म्हटलं जात होते. मात्र त्यावर मात करत मोदी सरकारने पुन्हा लोकसभा निवडणुकांसाठी तयारी केली होती. त्यात एक्झिट पोलनुसार भाजपचीच सत्ता येणार असं म्हटलं जात आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनीही या लोकसभेत आपली पुर्ण ताकद वापरली आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा अधिक गाजली आहे. म्हणूनच सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

.

Leave a Comment